Deepika Padukone Attends Diljit Dosanjh Concert
Deepika PadukoneSAAM TV

Deepika Padukone : दिलजीत दोसांझच्या गाण्यावर थिरकली मस्तानी, पाहा VIDEO

Deepika Padukone Attends Diljit Dosanjh Concert: बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण नुकतीच दिलजीत दोसांझचा कॉन्सर्टमध्ये दिसली. दीपिकाने याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Published on

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) अलिकडेच आई झाली आहे. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अलिकडेच दीपिका गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली.

नुकतेच गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh ) कॉन्सर्ट बंगळुरूमध्ये (Bangalore ) पार पडले. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दीपिका अशा मोठ्या कार्यक्रमात पाहायला मिळाली. दीपिका पदुकोणने स्वतः इंस्टाग्रामवर दिलजीतच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती खूप मजा करताना दिसत आहे. तिने लाइव्ह परफॉर्मन्सचा पूर्णपणे आनंद घेतला आहे.

बंगळुरूमधील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने दीपिकाच्या ब्युटी ब्रँडचे कौतुक केलं. दीपिका पदुकोणच्या ब्युटी ब्रँडचे नाव 82°E असे आहे. दिलजीत दोसांझचे कॉन्सर्टमध्ये सांगितले की, "त्याच्या सुंदर आणि निरोगी त्वचेचे रहस्य म्हणजे दीपिकाच्या ब्युटी ब्रँडचे प्रोडक्ट होय."

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिलजीत दोसांझ लाइव्ह परफॉर्मन्स देत असताना दीपिका पदुकोण स्टेजच्या मागे कॉन्सर्टचा आनंद घेताना , डान्स करताना दिसत आहे. दिलजीत दोसांझच्या या कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बंगळुरूमधील या कॉन्सर्ट दरम्यान दिलजीत दोसांझ आणि दीपिका पदुकोण यांच्यात एक उत्तम बॉन्ड पाहायला मिळाला. यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दिलजीत दोसांझ आणि दीपिका पदुकोण यांनी एकत्र गाणे गायले आणि डान्स देखील केला. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने बंगळुरूमधील प्रेक्षकांशी संवाद देखील साधला. त्यानंतर दिलजीत दोसांझ दीपिकाच्या कामाच कौतुक करताना दिसला.

Deepika Padukone Attends Diljit Dosanjh Concert
Pushpa 2 Box Office Collection Day 2: 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, 400 कोटींचा टप्पा पार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com