
richest CM of indai : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे १५ लाख रुपयांची संपत्ती असून त्यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. एसोएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) हा रिपोर्ट सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला.
रिपोर्ट म्हटलं आहे की, 'प्रत्येकी मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ५२.५९ कोटी रुपये आहे. एका मुख्यमंत्र्यांची सरासरी स्वकमाई १३,६४,३१० रुपये इतकी आहे. मुख्यमंत्र्यांची कमाई भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या कमाईपेक्षा ७.३ टक्क्याहून अधिक आहे. देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती १६,३० कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे विधानसपरिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
अरुणालच प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे ३३२ कोटींची संपत्ती आहे. सर्वाधिक संपत्ती कोणाची, या रिपोर्टनुसार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा दुसरा क्रमांक लागतो. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्याकडे ५१ कोटींहून अधिक सपत्ती आहे. त्यांचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे ४२ कोटींची संपत्ती आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न २४ लाख रुपये आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे २५ कोटी ३३ लाख रुपये आहे. त्यांची वार्षिक कमाई ही २२ लाख रुपये आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे ८ कोटी २२ लाख रुपये आहे. भूपेंद्र पटेल यांची वार्षिक कमाई १६ लाख रुपये आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १३ कोटी २७ लाख रुपये आहेत. तसेच त्यांची वार्षिक कमाई ही ३४ लाख रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.