Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका ४ महिन्यांची गरोदर, तरीही करतेय 'सिंघम अगेन'चं शुटिंग; फोटो व्हायरल

Pregnant Deepika Padukone Shooting Photo Viral: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन नेहमीच काही न काही कारणांनी चर्चेत असते. दिपिका पदुकोन आणि रणवीर सिंग लवकरच आई- वडिल होणार आहेत. दीपिका प्रेग्नंट असतानाही रोहित शेट्टीच्या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. याच शुटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन नेहमीच काही न काही कारणांनी चर्चेत असते. दिपिका पदुकोन आणि रणवीर सिंग लवकरच आई- वडिल होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.दीपिका आता पुन्हा एकदा नवीन कारणाने चर्चेत आली आहे. दीपिका प्रेग्नंट असतानाही रोहित शेट्टीच्या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. याच शुटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोन सध्या ४ महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे सांगण्यात येत आहे. गरोदर असतानादेखील दीपिका रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंगम अगेन' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. याच शुटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

व्हायरल फोटोंमध्ये दीपिका 'सिंगम अगेन' चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर काम करताना दिसत आहे. दीपिका चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने पोलिसांची खाकी वर्दी परिधान केली होती. डोळ्याला गॉगल आणि पोलिसांची वर्दी असा डॅशिंग लूक दीपिकाचा पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दीपिकाचे बेबी बंपदेखील दिसत आहे.

दिपिकाचे सिंगम अगेन चित्रपटाच्या शुटिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दिपिका गरोदरपणातदेखील काम करते म्हणून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

दीपिका-रणवीर सिंगने २८ फेब्रुवारीला सोशल मीडियाच्या माध्यमातून गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. सप्टेंबर महिन्यात दीपिका-रणवीरच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

रणवीर आणि दीपिका आई- बाबा होणार असल्याचे कळल्यापासून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नुकतंच एक मुलाखतीत, रणवीरला मुलगा की मुलगी हवी, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रणवीरच्या प्रतिक्रियेने सर्वांनाच भारावून टाकले आहे. 'आपण देवळात जातो तेव्हा प्रसाद म्हणून लाडू दिला किंवा शिरा दिला तरी आपण तो स्विकरातो. नाक मुरडत नाही. हेच मुलांच्याबाबतीतही लागू होते. देव जे देईल ते आनंदाने स्विकारेन', असं रणवीर म्हणाला.

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT