'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity MasterChef) सध्या खूप गाजत आहे. सेलिब्रिटी आपल्या मेजवानीने परिक्षकांना खुश करत आहेत. हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत जात आहे. या शोमध्ये नुकतेच तिसरे एलिमिनेशन पार पडले आहे. परिक्षकांना अर्ध शिजवलेले चिकन दिल्यामुळे या सदस्याला शोचा निरोप घ्यावा लागला आहे.
याआधी देखील उषा नाडकर्णी यांनी कच्चे चिकन शिजवले होते. त्यामुळे परिक्षकांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. आता तसाच एक प्रकार पुन्हा घडल्यामुळे एका स्पर्धकाला शो सोडावा लागला आहे. पहिल्या एलिमिनेशनमध्ये कॉमेडियन चंदन प्रभाकर बाहेर झाला. त्यानंतर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' च्या दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा उपविजेता अभिजीत सावंतची एक्झिट झाली.
आता तिसऱ्या एलिमिनेशनला आयेशा झुलका (Ayesha Jhulka) 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' च्या बाहेर पडली आहे. तिने परिक्षकांना कच्च चिकन खाऊ घातल आहे. या आठवड्यात दीपिका कक्कर, आयेशा आणि फैजूला ब्लॅक अॅप्रन मिळाले होते. आयेशाने चिकन आणि मोहरीची चटणी बनवली होती. परिक्षकांना मोहरीची चटणी खूप जास्त आवडली. मात्र अर्धवट शिजलेले चिकन खाऊन परिक्षक खूप नाराज झाले. यामुळे आयेशाला शो मधून बाहेर काढण्यात आले.
आयेशा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 90चे दशक गाजवले आहे. आयेशाने 1990 मध्ये तेलगू चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'कुर्बान' चित्रपटातून आयेशाने सलमान खान सोबत हिंदी चित्रपटात पदार्पण केले. तिने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तसेच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मानत घर देखील केले आहे. आयेशा झुलकाची शो मधून एक्झिट झाल्यामुळे चाहते खूप नाराज झाले आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा प्रवास 11 स्पर्धकांबरोबर सुरू झाला होता. यातील तीन स्पर्धकांनी शोचा निरोप घेतला आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मधून पुढे कोण बाहेर जाणार आणि अखेर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा विजेता कोण होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.