Celebrity MasterChef : सेलिब्रिटी मास्टरशेफसाठी 'ही' अभिनेत्री घेते सर्वाधिक मानधन; वाचा सविस्तर

Celebrity MasterChef Fees: सोनी टीव्हीवर सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कुकिंग रिॲलिटी शो सुरू झाला आहे. या शोमध्ये तेजस्वी प्रकाश आणि गौरव खन्ना यांच्यासह टीव्ही जगतातील अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले आहेत.
Celebrity MasterChef
Celebrity MasterChefGoogle
Published On

Celebrity MasterChef : टीव्हीवरील प्रसिद्ध रिॲलिटी शो मास्टरशेफ या सीझन एका नवीन ट्विस्टसह परतला आहे. मास्टरशेफच्या इतिहासात पहिल्यांदाच, या रिॲलिटी शोने त्याचे सेलिब्रिटी व्हर्जन आणले आहे. म्हणजेच यावेळी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये प्रसिद्ध टीव्ही स्टार्स स्पर्धक म्हणून स्वयंपाक करताना दिसणार आहेत. या स्टार्समध्ये 'नागिन' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, 'इंडियन आयडल' फेम अभिजीत सावंत, अनुपमा फेम 'अनुज' गौरव खन्ना, 'सिमर' फेम दीपिका कक्कर आणि 'बिग बॉस' फेम राजीव अदातया, निक्की तांबोळी यांचा समावेश आहे.

या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणाऱ्या या सर्व सेलिब्रिटींना निर्माते भरमसाठ फी देखील दिली आहेत. जर आपण स्पर्धकांना मिळालेल्या फीबद्दल बोललो तर या बाबतीत तेजस्वी प्रकाशने सर्वांना मागे टाकले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस १५ ची विजेती आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही सेलिब्रिटी मास्टरशेफच्या या सीझनमधील सर्वात महागडी स्पर्धक आहे. या शोसाठी तिला सुमारे ४ लाख रुपये फी मिळत आहे. तेजस्वीला दर आठवड्याला ४ लाख रुपये मिळणार आहे आणि तिला आठवड्यातून ४ दिवस या शोसाठी शूटिंग करावे लागते.

Celebrity MasterChef
Ibrahim ali khan: करण जोहर करणार सैफ अली खानच्या मुलाला लाँच; इब्राहिमसाठी लिहिली भलीमोठी पोस्ट

'अनुज' मागे राहिला

रुपाली गांगुलीच्या शोला निरोप दिल्यानंतर अनुपमाचा दुसरा पती 'अनुज' ची भूमिका साकारणारा गौरव खन्ना थेट सोनी टीव्हीच्या कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला आहे. या शोसाठी गौरवला मिळणारे मानधन तेजस्वीपेक्षा कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला एका आठवड्यासाठी ३ लाख रुपये मिळत आहेत. गौरवनंतर दीपिका कक्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'साठी दीपिकाला आठवड्याला २.५ लाख रुपये मिळत आहेत.

Celebrity MasterChef
Abhijeet Bhattacharya: गायक अभिजीत भट्टाचार्य वादात; पुणे पोलिसांत तक्रार, महात्मा गांधींबद्दल नेमकं काय बोलला होता?

जेवण बनवण्याची मोठी रक्कम

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि 'खतरों के खिलाडी' फेम फैसूला फराह खानच्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' साठी २ लाख रुपये मिळाले, तर बिग बॉस फेम निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि अर्चना गौतम यांनी या शोसाठी १.५ लाख रुपये घेतले आहेत. या सेलिब्रिटी स्पर्धकांव्यतिरिक्त, उर्वरित स्पर्धकांना म्हणजेच 'पवित्र रिश्ता' फेम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, राजीव अदातिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुक कविता आणि कपिल शर्मा फेम कॉमेडियन चंदन प्रभाकर यांना दर आठवड्याला सोनी टीव्हीच्या या कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचे १ लाख रुपये फी देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com