Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi
Abhijeet Bhattacharya on Mahatma GandhiSaam tv

Abhijeet Bhattacharya: गायक अभिजीत भट्टाचार्य वादात; पुणे पोलिसांत तक्रार, महात्मा गांधींबद्दल नेमकं काय बोलला होता?

Abhijeet Bhattacharya Controversy : गायक अभिजित भट्टाचार्य विरोधात पुणे पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. महात्मा गांधींबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
Published on

अक्षय बडवे

Abhijeet Bhattacharya : बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य हा त्याच्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहेत. काही दिवसांपूर्वी अभिजीत भट्टाचार्य याने महात्मा गांधी आणि जेष्ठ संगीतकार आर.डी बर्मन यांची एकमेकांशी तुलना करत, वादास्पद वक्तव्य केल्यामुळे त्याच्या विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिजीत भट्टाचार्य याने 'भारत देश आधीच अस्तित्वात होता पण पाकिस्तान देश तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत' असे वादास्पद विधान केल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला आहे. या अपमानास्पद विधानानंतर, सोशल मिडीयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जिथे लोकांनी त्याच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi
Don 3 villain: रणवीर सिंगच्या 'डॉन ३' मध्ये 'या' अभिनेत्याची एंट्री; चित्रपटातून चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज

ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी ॲड.असीम सरोदे,ॲड.श्रीया आवले, ॲड. रमेश तारू, बाळकृष्ण निढाळकर यांच्या सहकार्याने केली आहे. अभिजित भट्टाचार्य याने चुकीचे वक्तव्य करून कलुषित राजकारण करीत असल्याचा आरोपही मनीष देशपांडे यांनी केला आहे.

Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi
Rakhi Sawant Net Worth: कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंतची एकूण संपत्ती किती?; आकडा ऐकून व्हाल थक्क

गायक अभिजीत भट्टाचार्यने भारतीय संविधानाच्या कलम १९ (१) (अ) मधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोपही मनीष यांनी केला आहे. तसेच या तक्रारीबाबत पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही तर न्यायालयात हा मुद्दा उभा करण्यात येईल असा इशारा देखील देशपांडे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com