Mumbai News: बापरे! तोंडाने चिकन खाल्लं, हाड नाकातून काढलं, तब्बल साडेआठ तास सर्जरीनंतर डॉक्टरांची दमछाक, शेवटी...

Chicken Biryani: कुर्ल्यात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला चिकन बिर्याणी खाणं खूपच महागात पडलं. तरुणाच्या नाकामध्ये चिकनचं हाड अडकलं होतं ते बाहेर काढण्यासाठी तब्बल साडेआठ तासांची शस्त्रक्रिया करावी लागली.
Mumbai News:  बापरे! तोंडाने चिकन खाल्लं, हाड नाकातून काढलं, तब्बल साडेआठ तास सर्जरीनंतर डॉक्टरांची दमछाक, शेवटी...
Chicken BiryaniSaam Tv
Published On

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिकन बिर्याणी खाल्ल्यामुळे एका तरुणाची प्रकृती खराब झाली. बिर्याणी खाल्ल्यानंतर या तरुणाच्या घशाला सूज आली. त्यामुळे घाबरून हा तरुण डॉक्टरांकडे गेला. चिकन बिर्याणीमधील हाड या तरुणाच्या घशात अडकले होते. डॉक्टरांनी तब्बल साडेआठ तासांची शस्त्रक्रिया करून नाकात अडकलेले चिकनचे हाड बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी चिकन बिर्याणी खाल्ली होती. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणाच्या घशाला सूज आली आणि त्याला श्वास घ्यायला देखील त्रास होत होता. त्रास वाढत चालल्यामुळे हा तरुण हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी त्याला एक्स रे आणि सिटी स्कॅन काढण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तरुणाने एक्स रे आणि सिटी स्कॅन केले. त्याचसोबत डॉक्टरांनी दुर्बीणने देखील तपासणी केली तर या तरुणाच्या नाकाच्या मागच्या भागामध्ये हाड अडकल्याचे त्यांना दिसून आले.

Mumbai News:  बापरे! तोंडाने चिकन खाल्लं, हाड नाकातून काढलं, तब्बल साडेआठ तास सर्जरीनंतर डॉक्टरांची दमछाक, शेवटी...
Biryani Name History : 'बिर्याणी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी

कान, नाक, घसा विकारतज्ज्ञ डॉ. संजय हेलाळे यांनी सांगितले की, 'चिकनचे हाड तरुणाच्या नाकाच्या मागील बाजूला अडकले होते. हाड टोकदार असल्यामुळे तरुणाच्या अन्ननलिकेची दोन्ही टोकं खराब झाली होती. त्याचसोबत त्याठिकाणी संसर्गदेखील झाला होता. हा संसर्ग दूर करण्यासाठी या तरुणाला ३ दिवस इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर या तरुणाच्या मानेवर शस्त्रक्रिया करून नाकात अडकलेले हे हाड बाहेर काढले.'Biryani

Mumbai News:  बापरे! तोंडाने चिकन खाल्लं, हाड नाकातून काढलं, तब्बल साडेआठ तास सर्जरीनंतर डॉक्टरांची दमछाक, शेवटी...
Biryani Reciepe : बकरी ईद स्पेशल बिर्याणी; 'या' पद्धतीने बनवाल तर सगळेच तुमच्या रेसिपीचे फॅन होतील

चिकनचे हाड बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना तरुणाच्या मानेवर ३ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. एन्डोस्कोपीच्या सहाय्याने तब्बल साडेआठ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या नाकात अडकलेले हाड बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर तरुणासह डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या या घटनेची चर्चा होत असून चिकन बिर्याणी अथवा चिकनचे पदार्थ खाताना सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

Mumbai News:  बापरे! तोंडाने चिकन खाल्लं, हाड नाकातून काढलं, तब्बल साडेआठ तास सर्जरीनंतर डॉक्टरांची दमछाक, शेवटी...
Dum Anda Biryani Recipes : ढाबा स्टाईलने बनवा दम अंडा बिर्याणी, या सोप्या टिप्स लक्षात ठेवा; एकदा चव चाखाल तर खातच राहाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com