Bollywood Actors Get FDA Notice SAAM TV
मनोरंजन बातम्या

FDA Notice : तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका! शाहरुख खानसह ३ बड्या सुपरस्टार्सला थेट नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Bollywood Actors Get FDA Notice : बॉलिवूडचे काही कलाकार चांगलेच अडचणीत अडकले आहेत. शाहरुख खानसह तीन अभिनेत्यांना FDA ची नोटीस मिळाली आहे.

Shreya Maskar

तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूडचे कलाकार

शाहरूख खानसह 3 बड्या सुपरस्टार्सना FDA ची नोटीस

कलाकारांवर कारवाईची टांगती तलवार

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'विमल इलायची'ची जाहिरात ही प्रत्यक्षात 'विमल पान मसाला'ची (हे उत्पादन राज्यात प्रतिबंधित आहे) 'सरोगेट जाहिरात' (अप्रत्यक्ष जाहिरात) ठरते, असा आरोप यात करण्यात आला आहे.

तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यांविरुद्धची कारवाई प्रशासनाने तीव्र केली असताना, या तिन्ही अभिनेत्यांची आता FDA कडून चौकशी केली जात आहे. तसेच, प्रतिबंधित उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (MCOCA) लागू करण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधला जात आहे.

या आठवड्यात बजावण्यात आलेल्या नोटिशीद्वारे या तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या मते, ही जाहिरात 'विमल पान मसाला' ब्रँडशी संबंध जोडते आणि त्यामुळे ती या उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात ठरू शकते. १५ दिवसांत नोटीसला उत्तर दिले नाही तर ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या उत्पादनांचा प्रचार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदी वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे यांनी आता बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका दिला आहे. बॉलिवूड कलाकारांना नोटिसा अजय देवगणला त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानला वांद्रे येथील 'मन्नत' या निवासस्थानी आणि टायगर श्रॉफला त्याच्या 'टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी' या निर्मिती संस्थेमार्फत पाठवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

माझ्या, चिमण्यांनो! मुलींची माफी मागत ASI पोलीस अधिकाऱ्यानं जीवन संपवलं; लॉजमध्ये आढळला मृतदेह, नवी मुंबई पोलीस दलात खळबळ

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT