BMC चा मोठा निर्णय! पान - तंबाखू खाऊन हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नातेवाईकांना प्रवेश बंदी

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेने रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी गुटखा, तंबाखू आणि पान सेवन करणाऱ्यांवर कठोर निर्बंध घालण्याची तयारी सुरू केली आहे.
MUMBAI BMC PLANS ENTRY BAN ON GUTKHA AND TOBACCO USERS IN HOSPITALS TO IMPROVE CLEANLINESS
MUMBAI BMC PLANS ENTRY BAN ON GUTKHA AND TOBACCO USERS IN HOSPITALS TO IMPROVE CLEANLINESSSaam tv
Published On
Summary
  • मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

  • गुटखा, तंबाखू आणि पान खाणाऱ्यांवर नवीन निर्बंध

  • रुग्णालये आणि महापालिका कार्यालयांमध्ये प्रवेशापूर्वी सुरक्षा तपासणी

  • गुटखा किंवा तंबाखू सेवन केल्याचे आढळल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो

मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी आता गुटखा, तंबाखू आणि पान खाऊन येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर कठोर निर्बंध घालण्यात येणार आहेत सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांमुळे रुग्णालयांचे परिसर तसेच महापालिकेची कार्यालये घाण होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी यासंदर्भात महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. त्यामध्ये गुटखा, तंबाखू आणि पान खाऊन येणाऱ्या नागरिकांना महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये, रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये प्रवेशबंदी करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने या सूचनेचा विचार करत नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

MUMBAI BMC PLANS ENTRY BAN ON GUTKHA AND TOBACCO USERS IN HOSPITALS TO IMPROVE CLEANLINESS
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

नवीन नियमांनुसार, रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर तैनात असलेले सुरक्षा रक्षक येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची तपासणी करतील. गुटखा किंवा तंबाखू सेवन खाल्ल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच त्यांच्या जवळ गुटखा किंवा तंबाखू आढळल्यास तो जप्त करण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे.

MUMBAI BMC PLANS ENTRY BAN ON GUTKHA AND TOBACCO USERS IN HOSPITALS TO IMPROVE CLEANLINESS
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तयार होणाऱ्या नियमावलीमध्ये प्रवेशबंदी, दंडात्मक कारवाई तसेच थुंकून घाण केलेले ठिकाण संबंधितांकडून स्वच्छ करून घेण्यासारख्या उपाययोजनांचाही समावेश असणार आहे. स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि शिस्त राखण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येणार असून लवकरच तिची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com