Vicky Kaushal Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal : मुंबईच्या चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूड!, जाणून घ्या अभिनेत्याविषयी Unknown Facts

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नेहमीच भारदस्त अभिनयामुळे चर्चेत राहिला आहे. विकी कौशलचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला आहे. विकी कौशलला त्याच्या सिनेकारकिर्दित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ सारखा चित्रपट मिळाला अन् त्याचं नशीबच पालटलं. खरंतर विकी कौशलला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. जरीही विकी सध्या लक्झरीयस लाईफ जगत असला तरीही त्याने त्याचं बालपण मुंबईतल्या माहिममधील चाळीत घालवले आहे. शिवाय त्याने गरिबीही जवळून पाहिली आहे. विकीच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या चाळीतील दिवसांबद्दल...

विकीचा जन्म मुंबई नजीकच्या मालाडमध्ये झाला आहे. माझ्या आई-वडील १०X१० च्या रुममध्ये राहायचे. पण नंतर त्याच्या जन्मानंतर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. अभिनेत्याने त्याचं बालपण खूपच हालाकीच्या परिस्थितीत काढले आहे.

खरंतर विकीचे वडिल एक प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक आहेत, श्याम कौशल असं त्यांचं नाव असून त्यांनी बॉलिवूडला अनेक ॲक्शनपट दिलेले आहेत. विकीच्या वडिलांना बॉलिवूडमध्ये यश मिळण्यापूर्वी अनेक वर्षे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

एकदा विकीने मुलाखतीत सांगितले होते की, इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी माझ्या वडिलांनी त्याचं नाव न वापरण्याची मला तंबीच दिली होती. अभिनेत्याचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालेले आहे. त्याचे इतके शिक्षण पूर्ण झाले होते तरीही त्याला अभिनयातच रस होता.

विक्की कौशलने २०१२ मध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर, 'लव्ह साव ते चिकन खुराना' या चित्रपटाव्यतिरिक्त विकीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. पण २०१५ मध्ये रिलीज झालेल्या 'मसान' चित्रपटामुळे विकीचे कौतुक झाले.

विकीने 'राझी' आणि 'संजू' चित्रपटात साईड रोलचे काम केले होते. पण तरीही त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. अनेक चित्रपटांनंतर २०१८ मध्ये विकीला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाने नवी ओळख दिली. हा चित्रपट त्याच्यासाठी ब्लॉकबस्टर ठरला.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'उरी' चित्रपटासाठी विकीला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, विकीचं वार्षिक उत्पन्न ३८ कोटी इतकं आहे. तो एका चित्रपटासाठी जवळपास ३ कोटी रुपये इतके मानधन घेतो.

सध्या विकी कौशल ‘छावा’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरील विकीचे छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमधील अनेक फोटोज व्हायरल झाले होते. दरम्यान, या चित्रपटाची शुटिंगही झालेली आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटातही विकी दिसणार आहे. 'बॅड न्यूज' हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT