Harshali Malhotra 10th's Result: 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आयुष्याच्या टर्निंग पॉइंटलाच ठरली यशस्वी

Harshali Malhotra's 10th Class Result Declared: 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटातील मून्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा नेहमीच चर्चेत असते. हर्षाली मल्होत्राने नुकतीच दहावीची परिक्षा पास केली आहे.
Bajrangi Bhaijaan Fame Harshali Malhotra Score 83 Percent in 10TH Class CBSE Board
Bajrangi Bhaijaan Fame Harshali Malhotra Score 83 Percent in 10TH Class CBSE BoardSaam TV

'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटातील मून्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा नेहमीच चर्चेत असते. हर्षाली मल्होत्राने नुकतीच दहावीची परिक्षा पास केली आहे.

हर्षाली मल्होत्रीने सीबीएसई बोर्डातून दहावीची परीक्षा दिली होती. काल सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला. त्यात तिला ९३ टक्के गुण मिळाले आहे. हर्षालीने दहावीच्या परिक्षेत चांगले यश संपादन केले आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली आहे.

Bajrangi Bhaijaan Fame Harshali Malhotra Score 83 Percent in 10TH Class CBSE Board
Shah Rukh Khan: काळा गॉगल, पांढरी दाढी अन् लांब केस, किंग खानचा धाकड लूक चर्चेत; नव्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक?

हर्षाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिला सतत ट्रोल केले जायचे. 'बोर्डाचे पेपर आहेत अभ्यास कर', 'तुला अभ्यास नसतो का?' 'रिल बनवण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष दे'. 'अभ्यास करतेस की नाही?' असे अनेक प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारले होते. परंतु आता हर्षालीने नेटकऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

हर्षालीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्संना उत्तर दिले आहेत. हर्षालीच्या या यशाने चाहत्यांना खूप आनंद झाला आहेत. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Bajrangi Bhaijaan Fame Harshali Malhotra Score 83 Percent in 10TH Class CBSE Board
Tharla Tar Mag: सायली अर्जुनमधील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार का? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

हर्षाली नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. हर्षालीने ईदच्या दिवशी देखो चाँद आया या साँगवर रिल पोस्ट केली होती. तिने या गाण्यावर सुंदर डान्स केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com