Panchayat 3 Trailer
Panchayat 3 TrailerSaam Tv

Panchayat 3 Trailer: फुलेरा गावच्या निवडणुकीत येणार धक्कादायक ट्विस्ट; 'पंचायत ३' चा ट्रेलर बघाल तर चकित व्हाल

Panchayat 3 Trailer: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेबसीरीज 'पंचायत ३' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पंचायत वेबसीरीजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांना खूप जास्त आवडले होते. त्यानंतर प्रेक्षक तिसऱ्या भागासाठी उत्सुक आहेत.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेबसीरीज 'पंचायत ३' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पंचायत वेबसीरीजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांना खूप जास्त आवडले होते. त्यानंतर प्रेक्षक तिसऱ्या भागासाठी उत्सुक आहेत. वेबसीरीजच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये फुलेरा गावातील सचिवांची बदली रद्द करण्यात आल्याचे दिसत आहे. तर फुलेरा गावात सरपंचासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे गावात राजकारण चांगलंच तापलेले दिसत आहे. पंचायत ३ चा ट्रेलर खूपच रंजक आहे. यात रिंकी आणि सचिवजी यांची केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळणार आहे.

'पंचायत ३' च्या ट्रेलरमध्ये सुरुवातील सचिवजी फुलेरा गावात परत येतात. अभिषेक त्रिपाठी पुन्हा गावात परता आहे. सचिवजींची बदली रद्द झाल्याने ते नाराज असल्याचे दिसत आहे. तसेच गावात केंद्र सरकारची आवास योजना येते. त्यावरुन गावातील राजकारण अजूनच तापताना दिसत आहे. गावात दोन गटांमधील सरपंचाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळेच गावात आता सरपंचपदी कोण निवडून येणार? निवडणूकीत आमदार कोणाला सपोर्ट करणार? या सगळ्यात सचिवजी काय भूमिका बजावणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Panchayat 3 Trailer
Saif Ali Khan- Kareena Kapoor: सैफ अली खान-करीना कपूरच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने मिटवला बायकोच्या नावाचा टॅटू

'पंचायत ३' वेबसीरीज २८ मे रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. वेबसीरीजमध्ये जितेंद्र कुमार, फैसल मलिक, चंदन रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन दीपक कुमार मिक्षा यांनी केले आहे. या वेबसीरीजा ट्रेलर १७ मे रोजी रिलीज होणार होता. परंतु तो दोन दिवस आधीच रिलीज करण्यात आला आहे.

Panchayat 3 Trailer
Shashank Ketkar Video: कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन अभिनेता शशांक केतकर भडकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com