संजय जाधव साम टिव्ही, मुंबई
महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चातील तफावत आढळल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. खर्चातील तफावत स्पष्ट करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) शिंदे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना नोटीस बजावली आहे. राजकीय वर्तुळात ही मोठी घडामोड समोर येत आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आज निवडणूक आयोगाने नोटीस (Election Commission Notice To Ravindra Waikar) बजावली आहे. निवडणूक खर्चातील तफावतीमुळे ही नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची निरीक्षकांसमोर १३ मे २०२४ रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली होती. तेव्हा २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले होते. यावेळी उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे, असं निवडणूक निर्णय अधिकारी (Election Commission) वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्या्ंना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अचानकपणे साथ सोडून गेल्यामुळे ठाकरे गटाकडून रवींद्र वायकरांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्यावर आमदार अपात्रतेची कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्न देखील यावेळी त्यांना विचारण्यात आला होता. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या शिंदे गटातातील प्रवेशामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसलं होतं. आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल गजानन कीर्तिकर विरूद्ध रवींद्र वायकर अशी लढत होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.