Deva Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deva Box Office Collection : ॲक्शनचा धमाका 'देवा', पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई?

Deva Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'स्काय फोर्स'ला टक्कर देण्यासाठी आता 'देवा' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'देवा'चित्रपट (31 जानेवारी) ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने पहिल्या दिवसात किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात. 'देवा' (Deva) चित्रपटात शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) पूजा हेगडे देखाल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ॲक्शनचा धमाका आहे.

'देवा' पहिल्या दिवसाची कमाई?

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपट पहिल्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'देवा' चित्रपटाचे प्रमोशनही खूप तगडे झाले होते. 'देवा' चित्रपट वीकेंडला आपली जादू दाखवण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 1.67 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर नेहमी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. 'देवा' चित्रपटात शाहिद कपूरचा हटके स्वॅग दाखवण्यात आला आहे. शाहिद कपूरचा देवा' चित्रपट 85 कोटी बजेटमध्ये बनला आहे. बुधवारी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली होती. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

'देवा' चित्रपटात शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT