Kareena Kapoor : करीना कपूर, एक्स बॉयफ्रेंड शाहिद आणि पती सैफसोबत लिफ्टमध्ये अडकली तर?; करिनाचे उत्तर झाले व्हायरल

Kareena Kapoor : करीना कपूर आणि एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. पण अनेकदा चाहते करीना कपूर आणि एक्स शाहिद कपूर या कपलची आठवण काडत असतात.
kareena kapoor, saif ali khan and shahid kapoor
kareena kapoor, saif ali khan and shahid kapoorSaam Tv
Published On

Kareena Kapoor : बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूर ही टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. करिनाचा प्रत्येक चित्रपट लोकांना खूप आवडतो आणि तिच्यावर तिचे चाहते मनापासून प्रेम करतात. करीना कपूर प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. एक काळ असा होता की करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा चित्रपट जगतात रंगल्या होत्या. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. दोघांच्या वयातील फरकाबाबत बरीच चर्चा झाली होती. करीना तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. त्यामुळेच एका संवादादरम्यान करीना कपूरला एक प्रश्न विचारण्यात आला, ज्याचे उत्तर तिने अशा पद्धतीने दिले की, बेबोच्या नवऱ्यालाही लाज वाटेल.

सध्या सोशल मीडियावर करीना कपूर 2016 सालचा 'कॉफी विथ करण'मधील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये करण जोहरने करीना कपूरला तिचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि पती सैफ अली खानबद्दल मनोरंजक प्रश्न विचारले. त्यावर करिनाने काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

करणच्या प्रश्नाला करीनाचे मजेशीर उत्तर

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने करीनाला विचारले की, "ती शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत लिफ्टमध्ये अडकली तर ती काय करेल?" हा प्रश्न ऐकून करीना अवाकच राहिली आणि तिने असे धक्कादायक उत्तर दिले की करण जोहरलाच धक्का बसला. करीना गंमतीने म्हणाली, असे झाले तर खरोखर मजा येईल. शाहिद आणि सैफ जेव्हा 'रंगून' चित्रपटात काम करत होते, तेव्हा माझी या चित्रपटासाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे मी आम्ही तिघे एकाच लिफ्टमध्ये असण्याचा ;प्रसंग एन्जॉय कारेन असेही करीना पुढे म्हणाली. या प्रश्नावर करण जोहरला करिनाकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.

शाहिद करीना रिलेशनशिप

शाहिद आणि करीना यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे नाते बरेच काळ टिकले, पण 2007 मध्ये बेबो आणि शाहिद वेगळे झाले. मात्र, वेगळे झाल्यानंतरही त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. माहितीनुसार, जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा दोघेही 'जब वी मेट'मध्ये काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली होते. 'जब वी मेट' हा करीना आणि शाहिदचा हिट चित्रपट होता. यानंतर त्यांनी 'उडता पंजाब'मध्येही एकत्र काम केले. लोकांनाही हा चित्रपट आवडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com