Deva Movie : शाहिद कपूरच्या 'देवा' ला सेन्सॉर बोर्डची कात्री; चित्रपटातून 'हा' सीन करणार डिलीट

shahid kapoor Deva Movie: शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने एक सीन कट करण्यास सांगितले आहे. सीबीएफसीच्या सूचनेनुसार चित्रपटातून एक सीन काढून टाकण्यात आला आहे.
Shahid kapoor and pooja hegde deva movie
Shahid kapoor and pooja hegde deva movieGoogle
Published On

Deva Movie : शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच ३१ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु, त्याआधी, पुन्हा एकदा अभिनेत्याच्या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डकडून या चित्रपटातील एक सीन काढण्यास सांगितले आहे. तसेच, 'देवा'ला सीबीएफसीने रिलीजपूर्वी यू/ए प्रमाणपत्र घेण्याचा सल्ला दिला आहे.

'तेरी बात में ऐसा उलझा जिया' नंतर, शाहिद कपूर लवकरच 'देवा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज केले आहेत. पण, चित्रपटाला अद्याप सीबीएफसीकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही कारण शाहिद कपूर आणि मुख्य अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यातील लिप-लॉक सीन चित्रपटातून काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, याआधीही चित्रपटातून अनेक दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत.

Shahid kapoor and pooja hegde deva movie
Dhoom Dhaam Trailer: 'लग्नाची पहिली रात्र आणि गुंडांची एंट्री; यामी गौतमच्या 'धूम धाम'चा ट्रेलर रिलीज

देवा मधून ६ सेकंदांचा सीन काढून टाकला

सीबीएफसीने सांगितल्यानंतर, चित्रपटातून ६ सेकंदांचा सीन काढून टाकण्यात आला आहे. सर्व कट केल्यानंतर, चित्रपटाचा रन टाइम २ तास, ३६ मिनिटे आणि ५९ सेकंद आहे. चित्रपटातील कटव्यतिरिक्त, सीबीएफसीने चित्रपट निर्मात्यांकडून देवामध्ये दाखवलेल्या ऐतिहासिक ठिकाण हुतात्मा चौकाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. शाहिदचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आधी हा चित्रपट १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता, नंतर तो बदलून १४ फेब्रुवारी २०२५ करण्यात आला, परंतु नंतर तो ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shahid kapoor and pooja hegde deva movie
Prajkata Mali New Photo: 'इन द स्पॉटलाइट...'; प्राजक्ता माळीचा नवा बोल्ड अवतार पाहिलात का?

चित्रपटावर २ वर्षांपासून काम सुरू होते

'देवा'मध्ये शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, या चित्रपटात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 'देवा'चे दिग्दर्शक रोशन अँड्र्यूजबद्दल बोलायचे झाले तर, त्याने मल्याळम इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे आणि या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'देवा'ची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com