
Dhoom Dhaam movie Trailer: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या आगामी 'धूम धाम' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात यामीसोबत प्रतीक गांधी देखील मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, यामध्ये यामी आणि प्रतीक लग्नाच्या पोशाखात धावताना दिसले होते. आता चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये यामी गौतमची जबरदस्त व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे, तिच्या लुकचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे.
यामी गौतमच्या 'धूम धाम' चित्रपटाचा ट्रेलर
'धूम धाम' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार असून यामी गौतमच्या 'धूम धाम' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना, नेटफ्लिक्सने कॅप्शन लिहिले, 'लग्नाची पहिली रात्र, आणि त्यासोबत एक अनपेक्षित बारात.' १४ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर 'धूम धाम' नक्की पाहा! या चित्रपटात, अभिनेत्री कोएल चड्ढा चीही महत्वपूर्ण भूमिका आहे. तिचे लग्न डॉ. वीर म्हणजेच प्रतीक गांधीशी झाले आहे, जो एक गुजराती मुलगा आहे.
यामी आणि प्रतिकच्या 'धूम धाम' चित्रपटाचा ट्रेलर कोयल आणि वीरच्या लग्नाच्या रात्रीच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कपलच्या खोलीचे दार ठोठावल्याचा आवाज येतो आणि जेव्हा दार उघडते तेव्हा काही गुंड नवऱ्याशी भांडताना दिसतात. ते विचारतात चार्ली कुठे आहे? यानंतर सुरू होते अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीची रोमांचक कहाणी. ट्रेलरमध्ये पुढे कोयल आणि वीर धावताना दिसतात. दरम्यान, यामी अॅक्शन करतानाही दिसली. एकंदरीत हा ट्रेलर मनोरंजनाने भरलेला आहे.
'धूम धाम' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांचा 'धूम धाम' हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ऋषभ सेठ यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.