Prabhas: ५०० कोटीच्या 'या' चित्रपटात प्रभास दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; चित्रपटाची कथा झाली व्हायरल

Prabhas New Movie : प्रभासकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. सध्या, चाहते त्याच्या पुढील चित्रपट 'द राज साब' च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. त्याआधीही 'स्पिरिट' चित्रपटाच्या कथेबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
Prabhas film Spirit
Prabhas film SpiritGoogle
Published On

Prabhas New Movie : प्रभासच्या खात्यात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. 'कलकी २८९८एडी' नंतर प्रभास ज्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे तो म्हणजे द राजा साब. हा चित्रपट आधी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु असे म्हटले जात आहे की निर्माते प्रदर्शनाची तारीख बदलत आहेत. कारण सनी देओलचा 'जात' हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. प्रभास 'स्पिरिट', 'कलकी २८९८ एडी', 'फौजी', ​​'सलार २' यासह इतर काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. प्रभास सध्या फौजी चित्रपटावर काम करत आहे. त्यानंतर संदीप रेड्डी वांगीच्या स्पिरिटचे काम सुरू करणार आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

चित्रपटात प्रभास कोणाशी लढणार?

'स्पिरिट'मध्ये प्रभास पोलिसाची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांच्या भोवती फिरणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी प्रभासला एका डॅशिंग अवतारात प्रेखकांसमोर आणण्याची योजना केली आहे. तो या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारणार असून त्याचे निगेटिव्ह पात्र असणार आहे. संपूर्ण कथा आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांच्या भोवती फिरणार आहे आणि प्रभास चित्रपटात या ड्रग माफियांशी लढताना दिसणार आहे.

Prabhas film Spirit
Remo D'Souza: जीवे मारण्याची धमकी, इच्छापूर्तीचे धाडस; चेहरा झाकून रेमो डिसूझा पोहोचला महाकुंभ मेळ्यात!

असेही म्हटले जात आहे की संदीप रेड्डी वांगा यांनी चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलसाठी लोकेशन फायनल केले आहे. पहिले शूट जकार्तामध्ये केले जाईल, परंतु ते कधी सुरू होईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. अलिकडेच, अशी अफवा पसरली होती की मेगा प्रिन्स वरुण तेजला स्पिरिटची ​​ऑफर देण्यात आली आहे आणि तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तथापि, नंतर अभिनेत्याने ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले. प्रभाससोबत खलनायकाची भूमिका कोण साकारत आहे? हे अजूनही निश्चित झालेले नाही.

Prabhas film Spirit
Sky Force Box Office collection Day 3: ३ दिवसांत ६१ कोटी...; 'स्काय फोर्स' ठरला अक्षय कुमारसाठी टर्निंग पॉईंट

संदीप रेड्डी वांगाकडून खूप अपेक्षा

संदीप रेड्डी वांगाचा शेवटचा चित्रपट रणबीर कपूरसोबतचा 'अ‍ॅनिमल' हा होता. 'अ‍ॅनिमल' ला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अ‍ॅनिमलने ९०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com