बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर नेहमी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. शाहिद कपूर आता लवकरच 'देवा' (Deva) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'देवा' चित्रपट आज (31 जानेवारीला) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'देवा' चित्रपटात शाहिद कपूरचा हटके स्वॅग दाखवण्यात आला आहे.
चित्रपट पहिल्या दिवशी किती कोटींची कामाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याआधी 'देवा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन जाणून घेऊयात. ॲडव्हान्स बुकिंगची आकडेवारी पाहता शाहिद कपूरचा हा नवीन वर्षातील दमदार चित्रपट ठरू शकतो. हा चित्रपट रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आहे. शाहिद कपूरचा देवा' चित्रपट 85 कोटी बजेटमध्ये बनला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 1.67 कोटी रूपयांची कमाई केली आहे. 'देवा' ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी 4 ते 5 कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली होती. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
'देवा' चित्रपटात शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. शाहिदसोबत 'देवा' चित्रपटात पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. आता रिलीजनंतर 'देवा' चित्रपट अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ला तगडी टक्कर देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.