Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: बॉम्बने कार उडवून देऊ..., सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Targeted Again: सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला आहे. घरात घुसून त्याला जीवे मारण्याची आणि कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बॉम्बने कार उडवून देण्याची आणि घरात घुसून जीवे मारण्याची धमकी सलमान खानला मेसेजद्वारे देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्स्अप ग्रुपवर हा धमकीचा मेसेज आला आहे.

सलमान खानला धमकीचा मेसेज येताच वरळी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. ही धमकी नेमकी कुणी दिली? आणि कुठून आली? याचा तपास पोलिस सध्या करत आहेत.

सलमान खानला मागच्या वर्षी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या दिवशीच म्हणजे मागच्या वर्षी १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या घरावर गोळीबार केला होता.

सुदैवाने यामध्ये कोणलाही दुखापत झाली नव्हती. पण या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्याच्या घराला बुलेटप्रूफ काचा देखील लावण्यात आल्या होत्या. या गोळीबार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी बिश्नोई गँगच्या सांगण्यावरून हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती.

८ नोब्हेंबर २०२४ मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईच्या ट्राफिक कंट्रोल रुमला फोन करून ही धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या धमकीमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आली असल्याचे बोलले जात होते.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. मागच्या वर्षी सलमान खानला धमकीचा जो मेसेज पाठवण्यात आला होता त्यामध्ये अभिनेत्याकडून माफी मागण्यासाठी आणि लॉरेन्स बिश्नोई गँगसोबतचे प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लॉरेन्सच्या जवळची व्यक्ती असल्याचे सांगितले होते. सलमान खानने पैसे दिले नाही तर त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट केली जाईल असे या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT