Salman Khan : 'सिकंदर'चा स्वॅगच लय भारी, झपझप झाडावर चढला अन्..., पाहा VIDEO

Salman Khan Video : सध्या सलमान खान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो झाडावर चढलेला पाहायला मिळत आहे.
Salman Khan Video
Salman KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा भाईजान सध्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सिकंदर' (Sikandar) 30 मार्चला रिलीज झाला. सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही जोडी 'सिकंदर' चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 128.35 कोटीं रुपयांची कमाई केली आहे. अशात आता चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमान खान स्वतःसोबत निवांत वेळ घालवताना पाहायला मिळत आहे.

नुकताच सलमान खानने इन्स्टाग्राम एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो झाडावर चढू न फळ तोडताना दिसत आहे. भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान अनेकदा निवांत वेळ घालवण्यासाठी त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जातो. हा फार्म हाऊस निसर्गाच्या सान्निध्यात आहे. सलमान खानने त्याच्या फार्म हाऊस बाहेरील बेरीच्या झाडावर चढून बेरीचे फळ पाडली आहेत.

सलमान खान झाडावर झपझप चढताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. वयाच्या 59 वर्षी देखील सलमान खानमध्ये भरपूर जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सलमान खानने या पोस्टला एक हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की,"Berry good for u" कमेंट्समध्ये चाहते त्याच्या चपळाईचे कौतुक करताना दिसत आहे.

सिकंदर चित्रपट

'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान आणि रश्मिकासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'सिकंदर'चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल 85 कोटींना नेटफ्लिक्सने राइट्स खरेदी केले आहेत.'सिकंदर' दोन ते तीन महिन्यात ओटीटीवर पाहता येणार आहे.

Salman Khan Video
Riteish Deshmukh : 'बिग बॉस'ची ट्रॉफी उचलल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखनं दिलं उत्तर

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com