Sunny Deol: बॉलिवूडचा सलमान खानला सपोर्ट नाही? सनी देओल म्हणाला, 'एकतर्फी अपेक्षा...'

Sunny Deol On Salman Khan: सलमान खान आणि देओल कुटुंबात खूप चांगले नाते आहे. सलमान धर्मेंद्रचा त्याच्या वडिलांसारखा आदर करतो. त्याने नेहमीच सनी आणि बॉबीला पाठिंबा दिला आहे.
Sunny Deol On Salman Khan
Sunny Deol On Salman KhanSaam tv
Published On

Sunny Deol On Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच त्याच्या सिकंदर या चित्रपटाला इंडस्ट्रीतील इतरांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. या संदर्भात अभिनेता सनी देओलने आपले मत मांडले आहे. एका मुलाखतीत सनी म्हणाला, "मला वाटतं की शेवटी आपण सगळे माणसंच आहोत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाबद्दल चांगलं बोललं जावं असं वाटतं. यात काही चुकीचं नाही. पण आपल्या इंडस्ट्रीत अनेकदा असं होतं... असो, तिकडे न जाणेच बरं."

सनी देओल पुढे म्हणाला, इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये परस्परांविषयी कोणतीही नकारात्मकता नाही. तो म्हणाले, "माझ्या मते, सर्वजण एकमेकांना आवडतात आणि कधी कधी काही प्रसंग घडतात, ज्यामुळे थोडेसे मतभेद होऊ शकतात. पण मला माहित आहे की कोणाच्याही मनात कोणाविषयी नकारात्मक भावना नाहीत."

Sunny Deol On Salman Khan
Gulkand: ‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा नवा 'गुलकंद'!

सलमान खानच्या समर्थनाबद्दल बोलताना सनी म्हणाला, "सलमान खान असे व्यक्तीमत्व आहे जे नेहमीच सर्वांना आधार आणि पाठिंबा देतो आणि मला माहित आहे की जे कलाकार त्यांना ओळखतात ते देखील त्यांना समर्थन देतात. जीवन असेच आहे, ज्यात देवाण-घेवाण चालू असते. एकतर्फी अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही."

Sunny Deol On Salman Khan
Phule movie controversy: 'फुले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणांमुळे प्रदर्शनाची लांबणीवर

यापूर्वी, सलमान खानने त्याच्या चित्रपटांना इंडस्ट्रीतील इतरांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तो म्हणाला होते, "इंडस्ट्रीतील लोकांना वाटतं की मला शाउटआउटची गरज नाही, पण प्रत्येकाला गरज असते." पण, सलमानने सनी देओलला सपोर्ट करण्यासाठी सनीची विमानातील रिल स्टोरीला शेअर करुन #जाट असे लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com