सध्या 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) चांगलाच चर्चेत आहे. त्याचा 'झापूक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर लाँच सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ देखील हजर होता. तेव्हा रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) सूरज चव्हाणचे खूप कौतुक केले.
सूरज चव्हाणची 'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यावर लॉटरी लागली आहे. चित्रपटासोबत लवकरच त्याचे नवीन घर देखील बांधून पूर्ण होणार आहे. हे सर्व सूरजच्या कष्टायचे फळ आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर केदार शिंदेंनी (Kedar Shinde ) सूरजसोबत चित्रपट करण्याची घोषणा केली आणि आता 25 एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजच्या चित्रपटाची घोषणा झाल्यावर सूरज विजेता ठरल्याने केदार शिंदे त्याच्यावर चित्रपट बनवत आहे का? अशा चर्चा रंगल्या होत्या. आता यावर रितेश देशमुखने आपले मत मांडले आहे.
रितेश देशमुखने सांगितले की, "बिग बॉसमुळे माझी सूरजसोबत ओळख झाली. बिग बॉसच्या घरात असताना तिसऱ्या आठवड्यातच केदार शिंदेंनी सूरजवर चित्रपट करण्याचे ठरवले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, "विजेता कोणी होऊ दे पण मी सूरजवर चित्रपट बनवणार..." मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. सूरज जिंकल्यामुळे चित्रपट बनवला हे चुकीचे आहे. "
रितेश देशमुख पुढे केदार शिंदेंच कोतुक करत म्हणाले की, "केदार भाऊंची हिम्मत आणि कंमिटमेंटला माझा सलाम आहे. चित्रपटाचे संगीत, एडिटिंग, स्टोरी खूपच अप्रतिम आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. मला सूरजचा खूप अभिमान आहे" सध्या सूरज आणि त्याच्या टीमवर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.