Shreya Maskar
अलिकडेच 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सोहळा पार पडला आहे.
पुरस्कार सोहळ्यात रितेश आणि अमेय वाघची हटके जुगलबंदी पाहायला मिळत होती.
सोहळ्यात अमेयने रितेश देशमुखला विचारले की, जिनिलिया वहिनींना पुरणपोळी बनवता येते का?"
यावर रितेश उत्तर देत म्हणतो की, "दोन-दोन पुरणपोळ्या खातात..."
पुढे रितेश म्हणाला, "पुरणपोळी बनवण्यासाठी त्यांनी शेफ ठेवलाय ना, त्याचे नाव आहे रितेश..."
शेवटी रितेश म्हणतो की, "बाहेर लोक ठोकतात सलाम, घरात मी जिनिलियाचा गुलाम"
एकंदर रितेशने दिलेल्या उत्तरावरून असे समजते की, जिनिलियाला पुरणपोळी बनवता येत नाही.
रितेश देशमुख आणि जिनिलिया महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत.