Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Malad Crime News: मालाड पूर्वेतील मालवणी परिसरातील जुने चर्चजवळील निर्जन जागेत बुधवारी एका महिलेचा अर्धनग्न मृतदेह झुडपात आणि पत्र्याच्या शेडजवळ आढळला, घटना धक्कादायक ठरली आहे.
Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
Published On
Summary
  • मालाड मालवणी चर्च परिसरात ४० वर्षीय महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला.

  • शवविच्छेदन अहवालानुसार तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले.

  • महिलेची हत्या अन्यत्र करून मृतदेह तेथे टाकला असण्याची शक्यता तपासात.

  • पोलिस तपास सुरू असून आरोपी लवकरच गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी दिला.

मालाडच्या मालवणी परिसरातील जुन्या चर्चजवळील निर्जन जागेत बुधवारी एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पत्र्याच्या शेडजवळील झुडपात आढळून आला होता. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला मृतदेहावर कोणत्याही स्पष्ट जखमेच्या खुणा नसल्याने पोलिसांनी अपमृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान, महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र परिसरातील पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी तिची ओळख पटली. मृत महिलेचे नाव राणी शुक्ला (४०) असून ती कांदिवलीच्या चारकोप येथे आपल्या आई आणि १३ वर्षांच्या मुलीसह राहत होती. ती पतीपासून विभक्त झाली होती आणि पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती. सध्या तिच्या कुटुंबीयांकडून आणि परिचितांकडून पोलिस माहिती गोळा करत आहेत.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

शवविच्छेदन अहवालातून मात्र धक्कादायक बाब समोर आली. राणी शुक्लाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी लगेचच खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महिलेची हत्या करून तिला अर्धनग्न करुन मृतदेह चर्च परिसरात टाकण्यात आला असण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
Crime News: गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, डान्स शिक्षकाने बारावीच्या मुलीवर केला बलात्कार

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपी याच भागातील असण्याचा देखील अंदाज आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण असून आरोपीला शक्य तितक्या लवकर अटक केली जाईल, असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com