Crime News: गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, डान्स शिक्षकाने बारावीच्या मुलीवर केला बलात्कार

Delhi Crime Alert: दिल्ली येथील जहांगीरपुरीतील एका नृत्य अकादमीत बारावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी १४ सप्टेंबरला तक्रार नोंदवत आरोपी शिक्षक अमनला अटक केली.
JAHANGIRPURI DANCE ACADEMY TEACHER ARRESTED FOR RAPE OF MINOR GIRL
JAHANGIRPURI DANCE ACADEMY TEACHER ARRESTED FOR RAPE OF MINOR GIRL
Published On

दिल्ली येथील जहांगीरपुरीतील एका डान्स क्लासमध्ये शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ सप्टेंबरला तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी शिक्षक अमनला अटक केली. सध्या पीडितेचे समुपदेशन सुरु आहे, तसेच पोलिस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

वृत्तानुसार, १७ वर्षांची पीडित मुलगी भालस्व डेअरी परिसरात आपल्या कुटुंबासह राहते आणि मॉडेल टाऊनमधील एका खाजगी शाळेत १२वीची शिक्षण घेते. तिला डान्सची आवड असून, अभ्यासासाठी तिने जहांगीरपुरी ब्लॉकमधील नृत्य अकादमी शोधण्यासाठी गुगलचा वापर केला.

JAHANGIRPURI DANCE ACADEMY TEACHER ARRESTED FOR RAPE OF MINOR GIRL
Crime News: मैत्रीत धोका! दोस्ताच्या बायकोचे अश्लील AI व्हिडिओ तयार केले, ब्लॅकमेल करून महिलेवर केला बलात्कार

नेमकं प्रकरण काय?

पीडितेच्या सांगण्यानुसार, तिच्या कुटुंबाने तिला एका डान्स क्लासमध्ये दाखल केले. नृत्य शिक्षक अमन याने फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणाच्या बहाण्याने तिला क्लासमध्ये बोलावून तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्या वेळी क्लासमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेला धमकी दिली की, या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास तिचे करिअर उद्ध्वस्त केले जाईल. त्यानंतरही आरोपीने आणखी तीन वेळा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

JAHANGIRPURI DANCE ACADEMY TEACHER ARRESTED FOR RAPE OF MINOR GIRL
Shocking: संतापजनक घटना! हुंड्यासाठी सुनेवर अत्याचार; खोलीत बंद करून साप सोडला अन् किंकाळ्या ऐकून हसत बसले

गेल्या महिन्यात आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी पीडिता बचावून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि घरच्यांना सत्य परिस्थिती सांगितली. संपूर्ण घडलेल्या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या या मुलीचे सध्या समुपदेशन सुरू आहे.

JAHANGIRPURI DANCE ACADEMY TEACHER ARRESTED FOR RAPE OF MINOR GIRL
Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

प्रकरणाचा उलगडा होताच, पीडितेच्या वडिलांनी जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी डान्स शिक्षक अमनला अटक केली आहे. पोलिसांनी डान्स क्लासमधील इतर विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू केली असून, त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. सध्या या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे.

Q

जहांगीरपुरी येथील नृत्य अकादमीतील शिक्षकाविरोधात काय घटनाक्रम आहे?

A

शिक्षक अमनने बारावीच्या विद्यार्थिनीवर फेब्रुवारीपासून एकटं ठेवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.

Q

आरोपीविरुद्ध कोणती कायदे वापरून कारवाई करण्यात आली आहे?

A

पॉक्सो कायदा आणि बलात्काराच्या कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Q

 पीडितेच्या कुटुंबाने घटनेची माहिती केव्हा पोलिसांना दिली?

A

सप्टेंबर महिन्यात पीडितेने बचाव केला आणि नंतर कुटुंबीयांनी जहांगीरपुरी पोलिसांना तक्रार दिली.

Q

पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?

A

आरोपी शिक्षक अमनला अटक करून इतर विद्यार्थ्यांची चौकशी आणि समुपदेशन सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com