सातारा : सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. घरोघरी घटस्थापना करीत देवीची पूजा केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात आली आहे. तर नऊ दिवस अनेक भक्त उपवास करतात. उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर सातारा जिल्ह्यातील पांडे गावात नवरात्रोत्सवाची अनोखी परंपरा आहे. नवरात्रीचे ९ दिवस संपूर्ण गाव बसत नाही कि झोपत देखील नाही. झोपायचे झाले तरी ते देखील उभे राहूनच.
नवरात्रोत्सवाच कडक उपवास केले जात असतात. काहीजण नऊ दिवस उपवास करतात. मात्र एक वेळ जेवतात. तर काही जण केवळ उपवासाचं खाऊन नऊ दिवस उपवास करतात. जे नवरात्रीचा कडक उपवास करतात ते चप्पलही वापरत नाही. मात्र साताऱ्यात नवरात्रौत्सवातील अनोखी प्रथा समोर आली आहे. याला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं. या भक्तांची श्रद्धा पाहून नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
३५० वर्षांची परंपरा
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात. ही परंपरा साधारण साडे तिनशे वर्ष जुनी आहे. येथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते; अशी भक्तांची श्रद्धा आहे. पांडे या गावातील ३५० ते ४०० लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील मुस्लीम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात.
नऊ दिवसांच्या काळात बसत व झोपत नाही
पांडे गावातील हे उपासक नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात. तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो. हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खिर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं आणि दूध घेतात. तर हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसांच्या काळात ते बसत नाहीत. अख्खे नऊ दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा घेतात. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या नऊ दिवसास ते झोपत नाहीत. पळत नाही, चप्पल घालत नाही. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते. झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.