Bollywood Actor Ranveer Singh Filed Fir After Deep Fake Video Goes Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव, काय आहे प्रकरण?

Ranveer Singh Filed FIR For His Deepfake Video Case: आमिर खाननंतर अभिनेता रणबीर सिंगही डीपफेक व्हिडीओचा बळी पडला आहे. रणबीरचाही राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Chetan Bodke

Ranveer Singh Deepfake Video Case

एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) बनवण्याचे प्रकार काही थांबायचे नाव घेत नाहीये. याचे बळी जगभरातील अनेक मोठमोठे चेहरे पडले आहेत. अशातच आमिर खाननंतर आणखी एक अभिनेता ह्या डीपफेक व्हिडीओचा बळी ठरला आहे. आमिर खानप्रमाणेच रणबीर सिंगही डीपफेक व्हिडीओत राजकीय पक्षाचा प्रचार करताना तो दिसतोय. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, त्याने पोलिसांत धाव घेतली आहे. रणवीरने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. रश्मिका मंदान्ना, अक्षय कुमार, आमिर खाननंतर आता रणवीर सिंगही डीपफेक व्हिडिओचा बळी पडला आहे. सध्या डिपफेक व्हिडीओंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते. सध्या सर्वत्र देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रणवीर सिंह एका राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. एआयच्या माध्यातून तयार करण्यात आलेल्या या डीपफेक व्हिडीओविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी, रणवीर सिंह क्रिती सेनन आणि मनीष मल्होत्रासोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वाराणसीला गेला होता. यावेळी त्याचा एक व्हिडीओ शूट करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये अभिनेता राजकीय पक्षाबद्दल बोलताना दिसत आहे. पण, त्या व्हिडीओमध्ये त्याच्या आवाजामध्ये छेडछाड केली. व्हिडीओ एआयच्या माध्यमातून आणि व्हॉईस क्लोनच्या मदतीने त्याचे शब्द बदलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी अभिनेत्याने सोशल मीडियावर ‘डीपफेकपासून सावध राहा, मित्रांनो’ अशी पोस्ट त्याने लिहिलेली होती. त्यानंतर अभिनेत्याने व्हायरल व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली आहे. (Viral Video)

गेल्या काही दिवसांपूर्वी आमिर खानचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचे पाहायला मिळाले होते. व्हिडीओ वेगळा होता आणि त्यावरील बोलत असलेला कंटेंटही वेगळा होता. व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली होती. त्याने तात्काळ पोलिस स्थानकांत FIR दाखल केली होती. रणबीर सिंहच्या आधी रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट, नोरा फतेही, अक्षय कुमार, सोनू सूद, कतरिना कैफ, काजोल देवगण आणि आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओची शिकार झाले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT