Manoj Bajpayee SAAM TV
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee : 26 वर्षांनंतरही चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय 'सत्या'; गाण्याच्या तालावर थिरकले चाहते,पाहा VIDEO

Satya Movie : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांचा 'सत्या' चित्रपट आजही प्रेक्षकांना वेड लावत आहे. हा चित्रपट पाहायला चाहत्यांमध्ये भरपूर उत्साह पाहायला मिळत आहे. यासंबंधी एक खास व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत.'सत्या' हा त्यांचा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांना वेड लावत आहे. तर चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांना आजही आठवत आहे. 'सत्या' (Satya Movie) हा चित्रपट 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी भिखू म्हात्रेची भूमिका साकारली होती.

'सत्या' चित्रपटाचे मुख्य अभिनेते मनोज बाजपेयी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी 'सत्या' सिनेमा पाहताना चित्रपट गृहात सुरू असलेली तुफान मजा मस्ती दाखवण्यात आली आहे. मनोज वाजपेयी यांचा कल्ट क्लासिक चित्रपट 'सत्या' प्रेक्षकांना आजही वेड लावत आहे.

पुण्यातील 'मंगला' थिएटरमध्ये 'सत्या'चित्रपटाचा शो लागला होता. हा शो हाऊसफुल पाहायला मिळाला. चित्रपटात "सपने में मिलती है..." हे गाणे वाजताच प्रेक्षक गाण्याच्या चालीवर थिरकायला लागतात आणि भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण थिएटरमध्ये 'सत्या'चा जयघोष होत आहे.

अभिनेते मनोज बाजपेयी यांनी हा व्हिडीओ शेअर करत एक खास कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं की,"26 वर्षांनंतरही 'सत्या' अजूनही चित्रपटगृहात प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्यात काहीतरी जादू आहे. भावना, संगीत, अविस्मरणीय कथाकथन. कधीही जुना होत नाही असा अनुभव आहे." सध्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या 'फॅमिली मॅन' ने तर सोशल मीडियावर तुफान प्रेम मिळवले आहे. 'फॅमिली मॅन ३' यावर्षात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सीरिजसाठी प्रचंड उत्सुक आहेत. मनोज बाजपेयी कोणतीही व्यक्तिरेखा खूप छान पद्धतीने साकारतात. त्यांच्या मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT