Farah Khan : चित्रपटाची आवड अन् व्यावसायिक जागरूकता, फराह खाननं घेतला मास्टरक्लास

Farah Khan Masterclass : अजिंठा -वेरूळ चित्रपट महोत्सवात बॉलिवूडची स्टार फराह खान उपस्थित होती. या दरम्यान तिने प्रेक्षकांशी संवाद साधला. ती नेमकं काय बोली जाणून घ्या.
Farah Khan Masterclass
Farah KhanSAAM TV
Published On

नुकताच अजिंठा -वेरूळ (AIFF) चित्रपट महोत्सवाचा समारोप पार पडला आहे. या महोत्सवात 'शांतीनिकेतन' या चित्रपटाला 'सुवर्ण कैलास पारितोषिक' प्रदान करण्यात आले. बॉलिवूडची स्टार फराह खानने या सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेत्री, निर्माती, चित्रपट दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा 'मास्टरक्लास'ला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) यांनी 'मास्टरक्लास'मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी या मास्टरक्लासचे संचलन केले.

"चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक" असल्याचे दिग्दर्शक फराह खान यांनी सांगितले. 'मास्टरक्लास'मध्ये फराह खान पुढे म्हणाल्या, "गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम साँगपेक्षा अशी गाणी करणे मला जास्त आवडेल. एक कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून मला ही माझी ताकद वाटते. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते."

Farah Khan Masterclass
Sai Tamhankar : पायलट सईच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्याची खास कमेंट, कौतुक करत म्हणाला...

फराह पुढे म्हणाला, "कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती. कोरिओग्राफर म्हणून काम करत असले तरी दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे हे पक्के ठरवले होते. त्यामुळे 'ओम शांती ओम' सारखा चित्रपट केवळ चौदा दिवसात लिहून पूर्ण झाला. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्त्वाची आहे."

"इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण जपत कार्यरत राहणे गरजेचे आहे. तुम्ही जे स्वप्न पाहता ते ही सत्यात उतरविण्यासाठी प्रचंड मेहनत काम करा. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी संदर्भात स्वतः कारणे देण्यापेक्षा काम करत राहिले पाहिजे. या जगात अशक्य असे काहीच नाही. केवळ आपण विश्वास ठेवत मेहनत करणे आवश्यक आहे." असा मोठा आणि महत्त्वाचा संदेश फराह खान यांनी दिला.

शेवटी फराह खान म्हणाली, "'कभी हा कभी ना' चित्रपट माझ्यासाठी जसा कोरिओग्राफर म्हणून महत्त्वाचा ठरला तसाच 'ओम शांती ओम' दिग्दर्शक म्हणून महत्त्वाचा आहे. चार चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील एकाला अपयश आले. मात्र अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागलो तरच आपण पुढे जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला. "

Farah Khan Masterclass
AIFF: अजिंठा -वेरूळ चित्रपट महोत्सवाचा समारोप, सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट कोणता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com