मराठीपासून ते हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) कायमच तिच्या लूक आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्रीने नवीन वर्षात नवीन गोष्टी अनुभवायला आणि शिकायला सुरूवात केल्या आहेत. अलिकडेच सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंगचा (Paragliding ) अनुभव घेतला आहे.
सईने पॅराग्लायडिंग करतानाचा खास व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईने पॅराग्लायडिंग करतानाच्या व्हिडीओला एक खास कॅप्शन लिहिलं आहे. सई लिहिते की, "स्वातंत्र्य, शोध, धैर्य, परिवर्तन...सर्वात परिपूर्ण, रुजलेला, मंत्रमुग्ध करणारा, शुद्ध, थरारक प्रवास..." तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकरांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याच्या या पोस्टवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सई ताम्हणकरच्या या खास व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेता 'आर माधवन' (R. Madhavan) एक खास कमेंट केली आहे. 'आर माधवन' कमेंट करत म्हणाला की, "तर व्वा.. सई तुझा खूप अभिमान आहे... मलाही हे करायला हवे." यावर प्रतिक्रिया देत सई म्हणाली, "आर माधवन सर खूप धन्यवाद...तुमचे स्वागत आहे...आमच्यात सामील होण्यासाठी तुमचे स्वागत आहे..."
सई पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेत आहे. सई करिअरची वेगळी वाट म्हणून पॅराग्लायडिंग पायलट बनली आहे. सईची सोलो फ्लाईंग करण्याची जिद्द कमालीची आहे. सईच्या पोस्टवर गायक विशाल दादलानी , शाल्मली खोलगडे , तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करून तिचे भरपूर कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.