Karan Veer Mehra : बिग बॉसची ट्रॉफी उचलली अन् केली पहिली पोस्ट, म्हणाला...

Bigg Boss 18 Winner : टिव्हीचा हिरो करणवीर मेहरा 'बिग बॉस 18'चा विजेता ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Bigg Boss 18 Winner
Karan Veer MehraSAAM TV
Published On

लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 Winner) काल (19 जानेवारी) धमाकेदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला आहे. 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी करणवीर मेहराने उचलली आहे. तर विवियन डिसेना उपविजेता ठरला. 'बिग बॉस 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. या सर्वांना मात करून करणवीर विजेता ठरला.

बिग बॉसच्या विजयानंतर करणवीरने (Karan Veer Mehra) चाहत्यांसाठी पहिली पोस्टशेअर केली आहे. कुटुंबाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.सध्या करणवीर मेहराच्या पोस्टवर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. चाहते आणि कलाकार त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडत आहे.

करणवीर मेहरा आई आणि बहिणीसोबत ट्रॉफी घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने खूप खास कॅप्शन दिलं आहे. करणने लिहिलं की, "आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आला आहे. JANTA KA LAADLA जिंकला आहे. 'बिग बॉस 18' चा खरा हिरो त्याने दिलेल्या वचनानुसार ट्रॉफी घेऊन परतला आहे. प्रेक्षकांची खरी ताकद तुम्ही सर्वांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे हा विजय तुमचा आहे. दुसरी ट्रॉफी देखील आता घरी आली आहे. ती नेहमी चमकत राहील."

'बिग बॉस' टॉप 6

  1. करणवीर मेहरा

  2. विवियन डिसेना

  3. रजत दलाल

  4. अविनाश मिश्रा

  5. चुम दरांग

  6. ईशा सिंह

बिग बॉसच्या घरी येण्याआधी करणवीर मेहराने 'खतरों के खिलाड़ी 14' जिंकले होते. बिग बॉसच्या घरात करणवीरची शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांग यांच्यासोबत खूप छान मैत्री झाली. करणवीरला बिग बॉस जिंकल्यावर ट्रॉफीसोबत ५० लाख रुपये बक्षीस मिळाले.

Bigg Boss 18 Winner
Bigg Boss 18 Finale: शेवटच्या क्षणी बाजी पलटली, विवियन डिसेनाची ट्रॉफी हुकली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com