Sai Tamhankar: सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता सई ताम्हणकर गगनभरारी घेणार ! लवकरच नव्या करियरला सुरूवात करणार

Sai Tamhankar Become Pilot: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आली आहे, पण आता सई ताम्हणकर अभिनयाच्या पलिकडे जाऊन लवकरच एक पायलट होणार आहे.
Sai Tamhankar
Sai TamhankarInstagram
Published On

Sai Tamhankar: धाडसी वृत्तीने ती कायम चर्चेत राहणारी, बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या वेगवेगळ्या भूमिका मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात सई ताम्हणकरने एकदम अडवेंचर केली आहे. या मागचं कारण देखील तितकच खास आहे. सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई खास शिक्षण घेत आहे. हिंदी इंडस्ट्रीत सध्या सई जोमाने काम करत आहे. तरी अभिनयाच्या पलिकडे जाऊन सईला पायलट का व्हावंस वाटलं या बद्दल बोलताना सई सांगते...

Sai Tamhankar
Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी कंगना राणौतला मोठा धक्का! शेजारच्या देशात चित्रपटावर घातली बंदी

"कामशेत टेम्पल पायलट स्कूल मधून मी माझा पायलट कोर्सच प्रशिक्षण घेतलं आणि ही एक अशी शाळा आहे जिकडे कौशल्यपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात. भारतातील ही सगळ्यात बेस्ट स्कूल आहे कारण तुमची सेफ्टी, तुमची शिकण्याची आवड या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. मला खूप वर्ष असं वाटतं होत आपण नवीन काही शिकलो नाही आहे म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एवढे गुंतले जातो आणि मग अनेक गोष्टी कुठेतरी शिकायच्या राहून जातात आणि मग आपण नवीन काहीतरी शिकू शकतो का ? ते आपल्याला जमेल का ? असं वाटून जातं म्हणून गेले काही दिवस मी विचार करत होते आणि मग आव्हानात्मक स्पोर्ट्स ( अडवेंचेर स्पोर्ट्स ) हे आपल्याला जमत म्हणून पायलट होण्याचा विचार मनात आला.

Sai Tamhankar
Box Office Collection : राम चरणचा गेम चेंजर १०० कोटींच्या क्लबमध्ये, पुष्पा भाऊची कमाई किती?

या आधी सुद्धा मी स्कायडायव्हिंग केलं आहे तर मला असं वाटलं की पॅराग्लायडिंग शिकायला काय हरकत आहे ! हा विचार मनात ठेवून मी हा कोर्स करायला गेले आणि पुन्हा एकदा एक माणूस म्हणून जगता आलं. असं म्हणतात प्रत्येक खेळ हा तुम्हाला खूप कमालीचा अनुभव देऊन जातो तसचं या खेळा मुळे मला अनेक सुंदर गोष्टी अनुभवता तर आल्या पण स्वतःहा बद्दल अनेक गोष्टीचा उलगडाया निमित्ताने झाला. स्वतःची क्षमता, मनस्तिथी काय आहे हे या स्पोर्ट्स मुळे समजलं जेव्हा तुम्ही एखादा खेळ शिकता तेव्हा या गोष्टी देखील तुम्ही आपसूक शिकत जाता आणि असं म्हणतात पॅराग्लायडिंग तुम्हाला हे शिकवत की ज्या गोष्टीची तुमच्यात कमी आहे त्या गोष्टीवर तुम्ही आपोआप काम करता आणि हे काम तुमच्या खेळण्यातून होत हे उत्तम आहे.

पॅराग्लायडिंग पायलट व्हायचं होत असं अजिबात डोक्यात नव्हतं हा स्पोर्ट्स मला हटके वाटला आणि मी एखादी गोष्ट शिकायला घेते तेव्हा मला त्यात पुढे पुढे जायला आवडतं आणि ती गोष्ट अधिकाधिक आत्मसात करायला आवडते आणि म्हणून तितक्याच गांभीर्याने आवडीने मी ते शिकते. लोकांना कसं वाटत माथेरानला किंवा महाबळेश्वरला जाऊन कोणाबरोबर तरी बसून पॅराग्लायडिंग करून येतात तर थांबा हे तसं नाही तर मी नीट पॅराग्लायडिंग पायलटच प्रशिक्षण घेत आहे आणि माझ्यासाठी ही फक्त एक सुरुवात आहे"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com