
Manoj Bajpayee: मनोज वाजपेयी त्याच्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीवंतपणा आणतो. मग तो 'फॅमिली मॅन'चा श्रीकांत तिवारी असो किंवा 'सत्या'चा भिखू म्हात्रे असो. त्याचे प्रत्येक पात्र खास आहेत आणि या पात्रांसाठी तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी करत असतो. लवकरच मनोज वाजपेयीचा 'सत्या' हा कल्ट क्लासिक चित्रपट प्रदर्शित होणार असून अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयीने खुलासा केला की तो त्याच्या भिखू म्हात्रेच्या भूमिकेत इतका हरवला होता की तो गुंडासारखा विचार करू लागला. एवढेच नाही तर त्याला पाहून एक मुलगी घाबरून पळून गेली.
मनोज वाजपेयी यांचा कल्ट क्लासिक चित्रपट 'सत्या' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करत मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितले की भिखू म्हात्रे या पात्रासाठी त्याने त्याच्यासारखे विचार करायला सुरुवात केली आणि त्यासाठी खूप मानसिक तयारी केली.
मी गुंडासारखा विचार करू लागलो
मनोज म्हणाला, “मी एका दुकानात शिरलो त्याच क्षणी माझ्या समोरून कोणीतरी येत आहे याची मला पूर्णपणे कल्पना नव्हती मी दारातून आत जात होतो. त्या काळात मी मनातल्या मनात फक्त गुंडांसारखा विचार करत होतो. भिखू म्हात्रेचे पात्र माझ्या मनात घर करून राहिले. मी दारातून आत जात होतो आणि तिथून एक मुलगी बाहेर येत होती. मी लक्ष दिले नाही आणि तिच्याशी धडकलो. मी तिच्याकडे पाहिले आणि मला त्या मुलीच्या डोळ्यात भीती दिसली."
लोक मला गुंड समजू लागले
मनोज बाजपेयी पुढे म्हणाला, मी तिथेच थांबलो आणि १० सेकंद तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात मला प्रचंड भीती दिसत होती. यानंतर ती अचानक तिथून पळून गेली. तुम्ही कल्पना करू शकता की मी माझी मानसिक स्थिती काय होतो? लोक मला खरच गुंड समजू लागले.
मनोज वाजपेयी वर्कफ्रंट
मनोज बाजपेयी याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२४ मध्ये ते 'भैया जी', 'जोराम' आणि 'डिस्पॅच' मध्ये दिसले होते. हा अभिनेता आगामी वेब सिरीज 'फॅमिली मॅन ३' मुळे चर्चेत आहे. त्याने याबद्दल एक पोस्ट देखील शेअर केली आणि सांगितले की त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि 'फॅमिली मॅन ३' लवकरच प्रसारित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.