Himanshi Khurana Hospitalized: लालबुंद चेहरा , मेकअपने लपवला अन्... बिग बॉस फेम हिमांशी खुराना हॉस्पिटल ऍडमिट; काय झालं?

Himanshi Khurana: बिग बॉस १३मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री करणारी हिमांशी खुरानाला रुग्णालयात दाखल केले. पण तिचा व्हायरल फोटो पाहून तिला ट्रॉल करण्यात येत आहे.
Himanshi khurana
Himanshi khuranaInstagarm
Published On

Himanshi Khurana Hospitalized: 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशीला खुराणा रुग्णालयात दाखल केले आहे. तिने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते चिंतेत पडले. पण तिने मेकअप करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर युजर्स मजेदार प्रतिक्रिया देत तिला ट्रॉल करत आहेत.

हिमांशी खुरानाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे.हॉस्पिटलच्या पोशाखात तिच्या हातात विगो आहे आणि ती मेकअप करत आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पाहून चाहते काळजीत पडले आहेत. तिला कमेंट करून तिची विचारपूस करत आहेत.

Himanshi khurana
Jaya Bachchan: जया बच्चन किंग खानच्या कानाखाली का मारणार होत्या? 'ती' अफवा ठरली कारणीभूत! वाचा सविस्तर

एका वापरकर्त्याने असीम रियाझचा उल्लेख केला

हिमांशीच्या या पोस्टवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. एकाने लिहिले, 'काही उपयोग नाही, डॉक्टर फी कमी करणार नाहीत.' दुसऱ्याने लिहिले: "काहीही झाले तरी मुलींची लिपस्टिक जात नाही." हिमांशीचा एक्स बॉयफ्रेंड असीम रियाजचा उल्लेख करत एका वापरकर्त्याने लिहिले, 'असिम भाऊ, हिमांशीच्या तब्येतीची विचारपूस कर मित्रा.' एकाने विनोदाने लिहिले, 'मुली मरेपर्यंत मेकअप करत राहतील. आयुष्य जाऊ शकते पण मेकअप जाऊ नये.'

Himanshi khurana
Premachi Goshta 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट 2' लवकरच होणार प्रदर्शित

खराब आरोग्यामुळे करिअरवर परिणाम

हिमांशीने तिला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे हे सांगितलेले नाही. हिमांशीची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिला PCOS चा देखील त्रास असल्यामुळे ती आजारी पडत असते. याचा तिच्या कामावरही परिणाम झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com