Mithun Chakraborty SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, हेलेना ल्यूक यांनी घेतला अखेरचा श्वास

Mithun Chakraborty First Wife Helena luke Passed Away : बॉलिवूडचे सुपर डान्सर मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन झाले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि डान्सर मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty ) यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक ( Helena Luke) यांचे निधन 3 नोव्हेंबर 2024 रोजी झाले आहे. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.

बॉलिवूडचे डान्सर यांच्या पहिल्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला आहे. नुकतीच अभिनेत्री आणि नृत्यांगना कल्पना अय्यरने हेलेनाच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीची प्रकृती बऱ्याच काळापासून ठीक नव्हती. अद्याप हेलेनाच्या मृत्यूचे कारण समजले नाही आहे.

मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक यांची लव्ह स्टोरी

मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक यांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक यांनी लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांनंतर घटस्फोट घेतला. मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक यांनी आओ प्यार करें, दो गुलाब आणि साथ-साथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या 'मर्द' या चित्रपटात हेलेना यांनी काम केले आहे. 'मर्द' चित्रपटामुळे हेलेनाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटात हेलेनाने ब्रिटिश राणीची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?

Railway Recruitment: रेल्वेत १७८५ पदांसाठी मेगा भरती! १२वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

‘अजित पवारsss सगळ्यांचा नाद...,भाजप नेत्याच्या मुलाचे उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज, व्हिडिओने खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी ३ वेळा वाढणार महागाई भत्ता

SCROLL FOR NEXT