Famous Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या किंमतीमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद झाली आहेत. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशा गॅस टंचाईच्या काळात 'बिग बॉस' फेम अभिनेत्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वसामान्य लोकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्याने सिलिंडर संबंधित एक खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सिलिंडर विकताना दिसत आहे.

अमेरिका-इराण संघर्षामुळे एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. LPG सिलिंडरच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या किमतींमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंदही झाले आहेत. तसेच सर्वसामान्यांच्या घरी गॅसची टंचाई पाहायला मिळत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, लोक गॅस सिलिंडरचा काळा बाजार करताना दिसत आहे. अशात 'बिग बॉस 15' फेम अभिनेता राजीव अदातिया (Rajiv Adatia) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, राजीव रस्त्यावर गॅस सिलिंडर विकताना दिसत आहे. सिलिंडरची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसले.

राजीव अदातियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भरलेल्या सिलिंडरच्या गाडीसोबत पोज देताना दिसत आहे. निळ्या डेनिम जीन्स, राखाडी टी-शर्ट, स्टायलिश शूज आणि काळ्या चष्म्यात राजीव खूप हँडसम दिसत आहे. राजीवने एका सिलिंडरची किंमत चक्क 10 लाख ठेवली आहे. तसेच पोस्टला एक मजेशीर कॅप्शन दिले आहे.

राजीव अदातिया पोस्ट

"मी आता हे ठरवलंय की, सध्या बॉलिवूडपेक्षा गॅस विकण्यातच जास्त पैसा आहे! एका गॅस सिलिंडरची किंमत १० लाख! मला दिवसाला मिळणाऱ्या मानधनापेक्षाही हे कितीतरी जास्त आहे! ही तर सोन्याची खाणच आहे!" या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी विनोदी कमेंट्स करताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी विनोदाने राजीवला त्यांच्या घरी काही सिलिंडर पाठवण्याची विनंती केली आहे. ही फक्त एक मजेशीर पोस्ट आहे.

वर्कफ्रंट

राजीव अदातिया हा एक उत्तम अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. राजीव अदातियाला 'बिग बॉस 15' मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तो 'खतरों के खिलाडी' चा देखील भाग राहीला आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये देखील तो दिसला. राजीव अदातिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT