Arjun Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor : मलायकाच्या बर्थ डेनंतर अर्जुनच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला Never forget...

Malaika Arora : मलायका अरोराच्या वाढदिवसानंतर अर्जुन कपूरच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे, जाणून घ्या.

Shreya Maskar

फिटनेस क्विन मलायका अरोराचा (Malaika Arora) 23 ऑक्टोबरला वाढदिवस होता. मलायका आता 51 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. मलायकाच्या वाढदिवसानंतर अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अर्जुनने (Arjun Kapoor) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

बॉलिवूडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायमच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहिले. अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायका कुठेच दिसली नाही. आता मलायकाच्या वाढदिवसादरम्यान अर्जुनच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टचा संबंध त्यांच्या ब्रेकअपशी जोडला आहे.

अर्जुन कपूर आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. त्यात असे लिहिलं आहे की, 'Never forget who you are' हा 'द लायन किंग' या चित्रपटातील डायलॉग आहे. मलायका आणि अर्जुन अनेक बॉलिवूड पार्ट्या आणि डिनर डेटला एकत्र स्पॉट व्हायचे. मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी अर्जुन कपूर तेथे पहिला पाहायला गेला. तिच्या कठीण काळत तो नेहमी मलायकासोबत उभा राहिला.

arjun kapoor

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांनी आपल्या कामाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मलायका नेहमी आपल्या फिटनेसने प्रेक्षकांना प्रेरणा देत असते. तर अर्जुन कपूर आता 'सिंघम अगेन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य...

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Railway News : मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! आसनगाव-कसारा नव्या मार्गिकेबाबत सॉलिड अपडेट!

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

SCROLL FOR NEXT