अक्षय कुमारच्या १२ वर्षांच्या मुलीसोबत ऑनलाईन गेम खेळताना धक्कादायक प्रकार घडला.
ऑनलाईन गेम खेळत असताना ती सायबर क्राईमचा शिकार होता होता वाचली.
समोरच्या व्यक्तीने निताराकडे न्यूड फोटोंची मागणी केली.
वेळीच तिने आईला सांगितल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बॉलिवूड अभिनेता अक्षयची मुलगी सायबर क्राईमची शिकार होण्यापासून वाचली. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना सायबर गुन्हेगारांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. गेम चांगला खेळत असल्याचं सांगत माहिती तिची मागितली. अक्षय कुमारच्या मुलीसोबत संवाद साधणाऱ्याने न्यूड फोटोंची मागणी केली. त्याच्या मुलीने वेळीच आईला माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. अक्षय कुमारनं स्वत: हा संपूर्ण किस्सा सांगितला.
राज्यात होणारे ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून सायबर जागरुकता महिना साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या लेकीसोबत घडलेल्या सायबर क्राईमचा धक्कादायक प्रकार सांगितला.
माझी मुलगी मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होती. त्यावेळी सतत मेसेज येत होते की 'धन्यवाद', 'तू खूप चांगली खेळतेय' सुरूवातीला सामान्य मेसेज येते होते. पण त्यानंतर एक मेसेज आला 'तुम्ही कुठून आहात?' त्यावर निताराने उत्तर दिले 'मुंबई'. 'तुम्ही मेल आहात की फिमेल?' त्यावर निताराने उत्तर दिले फिमेल. हे प्रश्न इथवर थांबले नाही तर त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मेसेज केला की 'तुमचे न्यूड फोटो पाठवा.' हा मेसेज वाचताच माझ्या मुलीने मोबाईल बंद केला आणि त्वरीत माझ्या बायकोला जाऊन सांगितले. तिने ही खूप चांगली गोष्ट केली.
अक्षय कुमारने पुढे सांगितले की, 'इथून या गोष्टी सुरू होतात आणि सायबर क्राईमची सुरूवात होते. त्यामुळे पालकांनी सावध झाले पाहिजे. अशाप्रकारे लोक मुलांना जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशा घटनांमध्ये आत्महत्या देखील केली जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे त्यांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावे जेणे करून अशा धोक्यांपासून ते सुरक्षित राहितील. ' दरम्यान, अक्षय कुमारची मुलगी १२ वर्षांची आहे. तिचे नाव नितारा असून ती शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. अक्षय कुमार तिला लाइमलाइटपासून दूर ठेवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.