Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याने म्हटले आहे की हे त्याचे छोटेसे योगदान आहे.
akshay kumar
akshay kumarSaam Tv
Published On

Akshay Kumar : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. पंजाबी कलाकारांनंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने राज्यातील पूर मदत कार्यासाठी ५ कोटी रुपये दान केले आहेत. यापूर्वी एमी विर्कने २०० गावे दत्तक घेतली होती. तसेच, शहनाज गिल, सोनू सूद, दिलजीत दोसांझ आणि इतर कलाकार मदत साहित्य पोहोचवत आहेत. आणि लोकांना मदत करण्याचे आवाहनही करत आहेत.

ही माझी सेवा आहे

५ कोटी रुपये दान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, 'मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हो, मी पंजाब पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपये देत आहे, पण कोणालातरी दान करणारा मी कोण? जेव्हा मला मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिळते तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्यासाठी, ही माझी सेवा आहे, माझे खूप छोटे योगदान आहे.'

akshay kumar
Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

अक्षय कुमारने मदत केली

अक्षय कुमार पुढे म्हणाला, 'पंजाबमधील माझ्या बंधू-भगिनींवर आलेली नैसर्गिक आपत्ती लवकर दूर व्हावी अशी मी प्रार्थना करतो. देव तुम्हााला शक्ती देवो.' अक्षय संकटाच्या नेहमीच मदत करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. कोविड-१९च्या काळात 'भारत के वीर' उपक्रमाद्वारे त्याने सैनिकांच्या कुटुंबांना मदत केली आहे. यासह, दिलजीत दोसांझ, सोनू सूद, रणदीप हुडा, गिप्पी ग्रेवाल, हिमांशी खुराणा, जसबीर जस्सी, करण औजला, गुरु रंधावा आणि एमी विर्क यांसारख्या इतर सेलिब्रिटींनीही पंजाबला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे.

akshay kumar
Shilpa Shetty Raj Kundra: आधी हॉटेल बंद केलं, आता तब्बल 'इतक्या' कोटींची नोटीस...; शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी थांबेना

राज कुंद्रा चित्रपटाची कमाई देणार

शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांचा 'मेहेर' हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि त्यांनी जाहीर केले की जगभरातील त्याच्या पहिल्या दिवसाची कमाई पंजाब पूरग्रस्तांना दान केली जाईल. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार, सुमारे १,६५५ गावांना या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com