Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Mika Singh Property: मिका सिंग ९९ घरांचा मालक आहे आणि त्याच्याकडे १०० एकर जमीन देखील आहे. मिकाने सांगितले की त्याने इतकी जमीन आणि घरे कशी बांधली. मिकाने स्मार्ट गुंतवणुकीबद्दल दिली माहिती.
singer Mika Singh
Mika SinghSaamtv
Published On

Mika Singh: गायक मिका सिंग ९९ घरे आणि १०० एकर शेती जमिनीचा मालक आहे. त्याची संपत्ती बघून लोकांना असा प्रश्न पडला आहे की मिकाने खरोखरच गाणी गाऊन आणि संगीताचे कार्यक्रम करुन इतके पैसे कमवले आहेत की तो ९९ घरे आणि इतकी जमीन खरेदी करू शकतो? तर हे सर्व योग्य आणि स्मार्ट पद्धतीने पैसे गुंतवण्याचे परिणाम आहे. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की त्याने ९९ घरे कशी खरेदी केली. तसेच सह-गायकांना त्यांचे पैसे योग्य पद्धतीने गुंतवण्याचा सल्ला दिला.

मीका सिंगने काही काळापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की त्याचे ९९ वे घर शाहरुख खानची पत्नी आणि इंटीरियर डिझायनर गौरी खानने डिझाइन केले आहे. आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या ९९ घरांबद्दल सांगितले. त्याने सांगितले की त्यापैकी काही घरं स्वस्त आहेत तर काही महाग आहेत.

singer Mika Singh
Eye Care: रात्री आयलायनर लावून झोपल्याने डोळ्यांना होईल हे नुकसान, आताच टाळा 'या' चुका

मिका सिंग पुढे म्हणाला, 'आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत. आम्हाला पैशाचे काय करायचे आणि कुठे खर्च करायचे हे देखील माहित नव्हते. आम्हाला फक्त एक गोष्ट माहित होती की आपण जमीनदार असले पाहिजे. आजोबा देखील म्हणायचे की जमीन कधीही तुमचा विश्वासघात करत नाही. आम्ही आयुष्यात खूप पैसे कमवले आणि फक्त हे माहित होते की आपण मालमत्तेत गुंतवणूक केली पाहिजे.'मिका म्हणाला - बरेच श्रीमंत गायक, पण पैसे वाया घालवातात.

singer Mika Singh
Shilpa Shetty Raj Kundra: आधी हॉटेल बंद केलं, आता तब्बल 'इतक्या' कोटींची नोटीस...; शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी थांबेना

मिका सिंग म्हणाला, 'मी एकटाच श्रीमंत किंवा खास नाही, इंडस्ट्रीमध्ये असे अनेक गायक आहेत ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत. पण काही गरीब देखील आहेत जे मोठे मोठे ब्रँड वापरतात. कोणत्याही कारणाशिवाय चार्टर्ड विमानांमध्ये फिरत राहतात. हा मूर्खपणा आहे. कारण तुम्ही दिखावा करण्यासाठी पैसे वाया घालवतात.

मिका सिंगची एकूण संपत्ती आणि कमाई

काही वृत्तांनुसार, मिका सिंगची एकूण संपत्ती ४१४ कोटी म्हणजेच ४.१४ अब्ज रुपये आहे. तो एका कॉन्सर्टसाठी २५-५० लाख रुपये घेतो. त्याच वेळी, तो एका गाण्यातून सुमारे १० लाख रुपये कमावतो. मिका सिंगने त्याच्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे. एकेकाळी मिकाची कमाई ७५ रुपये होती आणि आज तो कोट्यवधींच्या मालक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com