Urfi Javed And Chitra Wagh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी जावेद कायद्याच्या कचाट्यात सापडणार? चित्रा वाघ यांचं पुन्हा ट्विट...

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद काही संपायचे चिन्ह दिसत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद काही संपायचे चिन्ह दिसत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली आहे. चित्रा यांच्या टीकेलाही उर्फीने प्रत्युत्तर दिले होते. 'उर्फी जावेदवर तात्काळ कारवाई करा' अशी मागणी काल पोलिस स्थानकात केली आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला उर्फीची दखल का घेत नाही असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ ट्विटरच्या माध्यमातून म्हणतात, "भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे हे राज्य महिला आयोग तिच्या या कृत्याचं समर्थन करतंय का ?"

सोबतच आणखी पुढे म्हणतात, "भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?" असा सवाल यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, त्या स्टोरीमध्ये उर्फीने म्हणाली होती की, राजकीय लोकांविषयी बोलणे खूप धोक्याचे असते. परंतु हे राजकारणी मला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत. यांच्यामुळे एकतर मी स्वतःला संपवेन किंवा हे माझी मानसिकता संपवतील. तसेच पुन्हा सांगते, मी हे सर्व सूरू केलेले नाही. मी कधीही कोणाचे वाईट केलेले नाही. ते लोक विनाकारण माझ्यावर आरोप करत आहेत.

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हा वाद अजून कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. परंतु यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. उर्फीची ही पोस्ट राजकीय नेत्यांवर काही परिमाण करेल का? या वादात कोण माघार घेईल? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT