Saam Tv
पनीर आणि टोफू हे दोन वेगवेगळे खाद्य पदार्थ आहेत. तसेच त्यांची चव सुद्धा वेगळी आहे.
पनीर दुधापासून तयार केले जाते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.
पनीरमध्ये जास्त प्रमाणात कॅलरिज असतात, त्यामुळे त्याचे सेवन वजन वाढवण्यासाठी केले जाते.
टोफू पनीर सारखा दिसणारा पदार्थ आहे, पण तो दुधापासून नाही तर सोया दुधापासून बनवला जातो.
टोफू हे एक प्रकारे वनस्पती आधारित आहे. टोफूमध्ये व्हिटॅमिन आणि अमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते.
पनीरचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, स्नायूंना फायदा होतो, दातांचे आरोग्य आणि पचनसंस्था सुधारते.
टोफूचे सेवन केल्याने कर्करोग होण्यापासून टाळता येतो, तसेच वजन नियंत्रणात राहते.
NEXT: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही 5 झाडे