Debina-Gurmeet Daughter's Name: देबिना- गुरमीतने लेकीच्या नावाचा केला उलगडा, जाणून घ्या तिच्या नावाचा अर्थ...

गुरमीत आणि देबिना यांना दोन कन्यारत्न प्राप्त झाली आहेत.
Debina Gurmeet Daughter
Debina Gurmeet DaughterInstagram @debinabon
Published On

Debina Gurmeet Reveal Their Daughter's Name: टेलिव्हिजनवरील हिट जोडी म्हणजे गुरमीत आणि देबिना. हे कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे या जोडीची सतत चर्चा देखील असते. गुरमीत आणि देबिना यांनी अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. एक वेगळ्या पद्धतीने दोघांनी त्यांच्या मुलीचे नाव त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. चला तर मी जाणून घेऊया काय आहे त्यांच्या मुलीचे नाव.

Debina Gurmeet Daughter
Ved Movie Success: बॉक्स ऑफिसवर 'वेड' सिनेमाचा धूमाकूळ; अवघ्या तीन दिवसात केली 'इतकी' कमाई, रितेशने मानले प्रेक्षकांचे आभार

२०२२ हे वर्ष गुरमीत आणि देबिना या जोडप्यासाठी खूप खास होते. या जोडप्याने एका वर्षात दोन वेळा बाळांना जन्म दिला आहे. गुरमीत आणि देबिना यांना दोन कन्यारत्न प्राप्त झाली आहेत. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पहिली मुलगी झाली. तर ११ नोव्हेंबरला त्यांना दुसरी मुलगी झाली.

गुरमीत आणि देबिना यांच्या मोठ्या मुलीचे नाव लियाना आहे. आता या दोघांनी त्यांच्या छोट्या मुलीचे नाव देखील त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. खूप दिवसांपासून त्यांचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव 'दिविशा' ठेवले आहे. तसेच त्यांनी या नावाचं अर्थ देखील सांगितला आहे. 'दिविशा' म्हणजे दुर्गा, असे देबिनाने सांगितले आहे.

गुरमीत आणि देबिना यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. या फोटोमध्ये दोघांनी त्यांच्या मुलीला उचलून घेतले आहे. तसेच त्यांनी हा फोटो समुद्रकिनार काढला आहे. न्यू इयर व्हेकेशन साजरे करत असताना या जोडप्याने त्यांचे मुलीचे नाव शेअर केले आहे. अभिनेत्री मौनी रॉयने त्याची ही पोस्ट लाईक केली आहे. दोघांचे फॅन्स त्यांना शुभेच्छा देत आहेत तसेच पोस्टवर लाईकचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com