Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

Maharashtra Marathi News Live Updates : आज शुक्रवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस पहाटेचा शपथविधी, विधानसभा निवडणुका प्रचारसभा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Pune News : पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना 

पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना

हडपसर मध्ये मगरपट्टा परिसरात एका इमारतीला लागली आहे

तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आगीची घटना

आगीचं कारण स्पष्ट

अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल आग विझवण्याचे काम सुरू

Batenge toh katenge : मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

मुंबईच्या JFA लाॅ फर्म आणि JSA आॅफिस कमला मिल लोअरपरळ च्या कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याच्या ईमेलने खळबळ

गुरूवारी दुपारी हा धमकीचा मेल लाॅफर्मला आला

JFA लाॅ फर्मच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद या ईमेल आयडीवरून हा धमकीचा मेल आला

यात JFA लाॅ फर्मचं कार्यालय आणि बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याचे म्हटले होते

या घटनेची गंभीर दखल घेत कार्यालयातील कर्मचार्याने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली

Batenge toh katenge: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Devendra Fadanvis on Batenge toh katenge: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू ऐक्याचे आवाहन करणाऱ्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमधून याला विरोध करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणाचे कौतुक केलेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणाबाजीत काहीही चुकीचे दिसत नसल्याचे सांगत हा आपल्या देशाचा इतिहास असल्याचे सांगितले.

मला योगीजींच्या घोषणेमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. या देशाचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा हा देश जाती, प्रांत आणि समुदायांमध्ये विभागला गेला तेव्हा, हा देश गुलाम झाला, असे फडणवीस म्हणाले.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील एका मुलीची परीक्षेची फी भरली म्हणून त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली.

Shiv Sena vs Shiv Sena: शिवसेना शिंदे गटाचा हा बाण बाळासाहेबांचा नाही, हा बाण मोदी आणि शहा यांचा आहे - कैलास पाटील

Maharashtra Marathi News Live Updates : शिवसेनेचा शिंदे गटाचा हा बाण बाळासाहेबांचा नाही हा बाण मोदी आणि शहाचा आहे.अशी टीका उस्मानाबाद येथील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांनी केली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण आणि शिवसेना ठाकरे गटाची मशाल अशी लढत आहे. भाजपमधून उमेदवार आयात करत शिवसेना शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे उमेदवार भाजपचा आणि मोदी, शहा, फडणवीस यांचं असल्याचा टोला कैलास पाटील यांनी लगावला. प्रचारा निमित्त गावभेट दौऱ्या दरम्यान ते बोलत होते शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे आणि ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्यात सामना आहे.

Eknath Shinde nanded speech live:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज नांदेडमध्ये दोन सभा

Nanded News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांच्या आज नांदेडमध्ये दोन प्रचार सभा होणार आहेत.भाजपाच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोट निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आज भोकर तालुक्यातील बारड येथे प्रचार सभा होणार आहे.सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा राज्यातील दोन अधिकाऱ्यां सोबत पन्नास पोलीस कर्मचारी या बंदोबस्ता साठी तैनात करण्यात आले आहेत.बारड येथिल सभा संपल्या नंतर नांदेड उत्तर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाचा समाचार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

maharashtra election voting : नागपूर जिल्ह्यात गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

- नागपूर ग्रामीणमधील अतिदुर्गम भागातील मतदारांनी निवडून आयोगाने घरापर्यंत पोहचून दिली मतदानांची संधी...

- नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार

- नागपूर ग्रामीणमध्ये १४१६ तर नागपूर शहरात २०२१ मतदार गृह मतदान करणार

- निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यांना केली गृह मतदानाची सोय

- गृह मतदानाचा आजचा शेवटचा दिवस

Maharashtra Marathi News Live Updates :  उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये घेणार तीन सभा

- उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये घेणार तीन सभा

- मनमाड मालेगाव आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

- मनमाड आणि नाशिक शहरात होणाऱ्या सभाकडे विशेष लक्ष

- शहरात उद्धव ठाकरेंचे तीन उमेदवार आहेत रिंगणात

- निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने ते काय बोलणार याकडे लक्ष

- तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील आज नाशिकमध्ये विविध मान्यवरांसोबत करणार चर्चा

- शहरातील व्यवसायिक, व्यापारी डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत करणार चर्चा

Maharashtra Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

ख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या होणार 3 सभा

दापोलीचे शिवसेना उमेदवार आणि आमदार योगेश कदम यांची माहिती

दापोली, गुहागर आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची होणार सभा - योगेश कदम

12 वाजता दापोलीत होणार जाहीर सभा,

2 वाजता गुहागरमध्ये होणार सभा

4 वाजता राजापूरमध्ये होणार सभा

त्यानंतर सिंधुदुर्गत सभा होणार

रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत

Maharashtra Rain : रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Rain :  रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या अचानक पडलेले या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला यामुळे दिलासा मिळाला परंतु ग्रामीण भागातील भात शेतीला याचा फटका बसला. अनेक ठिकाणी अजूनही भात कापणीचे काम चालू आहे त्यामुळे या पडणाऱ्या पावसामुळे याचा फटका भात शेतीला होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे.

Maharashtra Marathi News Live Updates :  थोड्याच वेळात मनसेचा जाहीरनामा समोर येणार

Maharashtra Marathi News Live Updates : आठवडाभरातच वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक

दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली तरी, शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. आता आठवडाभरातच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली त्यात एकट्या कारंजा बाजार समितीत गत गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. तर वाशिम बाजार समितीतही आठवडाभरात ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. याबाजार समितीत गुरुवारला १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे बाजार समितीच्या लिलावातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

uddhav thackeray Live : नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

नाशिक जिल्ह्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचाराची तोफ धडाडणार असून मनमाड,मालेगाव, नाशिक येथे त्यांच्या प्रचारसभा होत आहे मनमाड येथे शिवसेना उमेदवार गणेश धात्रक व मालेगाव येथे अद्वय हिरे यांच्यासाठी या प्रचार सभा होत आहे,मनमाड येथे पहिली सभा होत आहे.

Maharashtra Marathi News Live Updates :  पंचगंगा घाट ५१ हजार दिव्यांनी उजळला  

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य केलेल्या दिपोत्सववामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीघाटावर आज पहाटे लखलख तेजाची न्यारी दुनिया पहायला मिळाली. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या दीपोत्सवात कोल्हापूरकरांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने पंचगंगा घाट पहाटे उजळून निघाला. जोडीलाच विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आणि भक्तिगीतांचा सुरेल संगम... आजचे हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीघाटावर गर्दी केली होती. आज काढलेल्या रांगोळ्यांमध्ये आणि देखाव्यांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा देखावा हा लक्षवेधी होता तसेच रांगोळीच्या माध्यमातून राजकीय संदेश देखील देण्यात आले होते.

Maharashtra News Live Updates:  रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर दिला

आम्ही भाजपसोबत असलो तरी आमची विचारधारा शिव, शाहू ,फुले आंबेडकरांची आहे. एखाद्या पक्षासोबत असलो म्हणजे त्यांच्या विचारधारेशी सहमत असायाला लागत नसल्याच सांगत चाकणकर यांनी आपली भूमिका भाजप पेक्षा वेगळी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com