Urfi Javed : 'मी भाजपमध्ये आले की...'; संजय आठवतो का म्हणत उर्फीचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

उर्फी देखील सोशल मीडियावर चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे.
Urfi Javed News
Urfi Javed News Saam Tv
Published On

Urfi Javed News : भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला आहे. भाजप महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदनं सोशल मीडियावर अंग प्रदर्शन केल्यामुळे थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर उर्फी देखील सोशल मीडियावर चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला असून उर्फीने आता चित्रा वाघ यांना थेट संजय राठोड प्रकरणाची आठवण करून देत टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पत्र लिहीत विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार दाखल केली आहे. 'उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा' अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीला चांगलच धारेवर धरलं आहे.

Urfi Javed News
Urfi Javed News: ....तर नंगट मानसिकता का म्हणू नये?; उर्फी जावेदवर चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

दुसरीकडे उर्फी जावेद देखील चित्रा वाघ यांना ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. उर्फीने नुकतच एक ट्विट करत संजय राठोड प्रकरणाची आठवण करून चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

उर्फी ट्विट करत म्हणाली, 'मी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चित्रा वाघ यांच्याशी चांगली मैत्री करण्यासाठी वाट पाहू शकत नाही. चित्रा वाघ, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरल्या. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या विरोधात भरपूर हल्लाबोल केला होता'.

उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिल्यानंर त्या काय उत्तर देतील, हे पाहावे लागणार आहे. तर उर्फीने संजय राठोड यांचं नाव घेतल्यानंतर ते यावर काय प्रतिक्रिया देतील, हे देखील पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com