Urfi Javed News: उर्फी जावेदच्या प्रकरणात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे असा वाद उभा राहिला आहे. चित्रा वाघ यांनी कडक शब्दात उर्फीच्या फॅशनचा निषेध केला आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस, केतकी चितळे आणि कंगणा रनौत यांच्याशी उर्फीची तुलना करत व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रश्नांचा मोठा पाढा वाचत सुषमा अंधारेंना प्रत्युत्यर दिलं आहे. (Latest Urfi Javed News)
ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो तसं करतो, किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते, सुषमा अंधारेंच्या या वक्तव्यावर उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या की, "आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ?", असा पलटवार करत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना सवाल केला आहे."
पुढे त्यांनी म्हटले आहे की, "व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाही. स्वैराचाराला अटकाव घालणं, हा ही धर्म नाही का ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का ? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ?" असे प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊया. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपूया. खऱ्या अर्थानं, महिला सक्षमीकरणाचा जागर करूया, हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का ? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाही, समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्यात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.