Bipasha Basu News Instagram @bipashabasu
मनोरंजन बातम्या

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात बिपाशा बसू झाली भावूक ; Video व्हायरल

लवकरच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आई-बाबा होणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींचा विवाहसोहळा हा चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु त्याहून जबरदस्त चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या बेबीप्लॅनिंगची. सध्या अभिनेत्री त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आहेत. दरम्यान काही महिन्यापूर्वी अभिनेत्री बिपाशा बासूने चाहत्यांना आंनदाची बातमी दिली. तिने गरोदर असल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. लवकरच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आई-बाबा होणार आहेत.

अभिनेत्री बिपाशा बासू सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांचे कुटुंब छोट्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहेत. नुकताच बिपाशा बासूचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. जो या कपलसाठी खूपच खास ठरला आहे. बिपाशा बसूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

बिपाशा बासूने तिच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात काही जवळच्या मित्रमैत्रिंणीना आमंत्रित केले होते. नुकताच समोर आलेल्या फोटोमध्ये या कार्यक्रमाची थिम आणि टॅगलाईन चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे. कार्यक्रमाची टॅगलाईन 'अ लिटिल मंकी इज ऑन द वे' अशी आहे. तसेच या कार्यक्रमाचा ड्रेस कोट सुद्धा होता. ज्यामध्ये स्त्रियांना गुलाबी रंग तर पुरूषासाठी निळा रंग होता.

बिपाशा बसू लाईट गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोही आला आहे. दरम्यान, बिपाशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती केक कापताना अचानक भावूक झाली आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हरला मिठी मारून रडू लागली. आपल्या प्रेयसीला प्रेमाने मिठी मारणाऱ्या अभिनेत्याचा काळजीवाहू स्वभावही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सोहळ्यात बिपाशा आणि करण हातात हात घालून एन्ट्री घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी, बिपाशाच्या आईने घरात बंगाली पारंपारिक रसम (शाद) ठेवली होती. यादरम्यान बिपाशाने गुलाबी रंगाची पारंपारिक साडी नेसली होती. बिपाशाला लवकरच तिच्या बाळासह पाहण्यासाठी चाहतेही अधीर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT