मुंबई: 'राष्ट्रीय चित्रपट दिनी' (National Cinema Day) देशभरात चित्रपट विविध शहरांमध्ये ७५ रुपयांमध्ये दाखवण्यात आला होता. कालच संपूर्ण देशभरात प्रेक्षकांनी चित्रपट दिन साजरा केला. बॉलिवूडलमधील (Bollywood) सध्याचे अनेक चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे (Boycott) म्हणावा तितका बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) गल्ला जमवू शकले नाही. त्यामुळे मल्टिप्लेक्स ऑफ इंडियाने (Multiplex Of India) मनोरंजनसृष्टीला उभारी मिळावी यासाठी हा दिन साजरा करण्याचे ठरवले होते. त्यामुळे दिग्दर्शक सोबतच अभिनेता हेमंत ढोमेने ट्विट करत 'प्रेक्षकांसाठी मनोरंजनही महाग होतंय का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेमंतने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट करताना तो म्हणतोय, " आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५रु असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. सगळीकडे मराठी सिनेमा हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करु शकतात? प्रेक्षकांना मनोरंजन महाग होतंय का?"
तसेच आणखी एक मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर आपल्या फेसबूक पोस्ट मध्ये बोलतो, "सिनेमांची तिकीट योग्य दरात असतील तर लोक जे सिनेमा तिकीट खरेदी करु शकत नाहीत ते जात आहेत. आज जवळपास सर्वच चित्रपटांचे शो हाऊसफुल्ल आहेत. "
राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या औचित्याने चाहत्यांना चित्रपटगृहात ७५ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. कोरोनानंतर सहसा कोणत्याही चित्रपटाने हाऊसफुलचा बोर्ड पाहिला नव्हता. त्यामुळे 'राष्ट्रीय सिनेमा दिन'च्या निमित्ताने का होईना सर्व थिएटर हाऊसफुल झालेले दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.