Amitabh Bacchan: राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने बिग बींची भावूक पोस्ट; 'आता स्वर्गात देवाला ही हसव'

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक भावूक पोस्ट सोबत भाऊक संदेशही लिहीला आहे.
Big B Amitabh Bachchan Post
Big B Amitabh Bachchan PostSaam Tv

मुंबई: सर्वच प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारे सोबतच अख्ख्या बॉलिवूडला (Bollywood) सुद्धा आपल्या विनोदी शैलीने खिळखिळवून ठेवणारा विनोदवीर म्हणजे राजू श्रीवास्तव (Raju Srivastav). राजू आपल्या विनोदीशैलीने प्रत्येकाला हसवायचे. त्यांच्या निधनाच्या बातमीने बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) सुद्धा दु:खी झाले आहेत. राजू श्रीवास्तवांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी त्यांनी ऑडिओ नोट पाठवली होती. परंतू त्यांनी केलेली प्रार्थना असफल ठरली आहे.

Big B Amitabh Bachchan Post
National Cinema Day: 'प्रेक्षकांसाठी मनोरंजनही महाग होतंय का?' मराठी दिग्दर्शकांचा प्रेक्षकांना प्रश्न

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक भावूक पोस्ट लिहीली आहे. बिग बींनी पोस्टमध्ये भावनिक संदेश लिहीला आहे. राजू यांचे चित्रपट, शो, कुटुंब, मित्रांव्यतिरिक्त त्यांच्यात असलेल्या नात्याचा उल्लेख ब्लॉगमध्ये केला आहे. बिग बींनी गुरुवारी त्यांच्या ब्लॉगवर राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली.

Big B Amitabh Bachchan Post
Urfi Javed: फॅशनिस्टा उर्फी जावेदच्या 'सिमकार्ड' लूकची होतेय सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

बिग बी अमिताभ बच्चन आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'आणखी एक सहकारी, मित्र आणि एक सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला. अचानक आजाराने ग्रासले आणि नंतर त्याचे अकाली निधन झाले. त्याच्या क्रिएटिव्हची पूर्तता न करता, रोज सकाळी तो आपल्या प्रियजनांकडून माहिती घेत असे. त्याची प्रकृती सुधारण्यासाठी व्हॉईस मेसेज पाठवण्याचा सल्ला देण्यात आला होता

Big B Amitabh Bachchan Post
Masterchef India: तुमच्यात देखील पाककलेचे कौशल्य आहे? तर, 'मास्टर शेफ' च्या नव्या सिझनमध्ये आजच ऑडिशन द्या !

होता आणि मी केला सुद्धा. तो कानात वाजवायचा.. काही क्षण डोळे उघडले की..आणि मग.. गेला..त्याची जाणीव विनोद आणि जबरदस्त कॉमिक टाइमिंग नेहमीच आमच्यासोबत असेल.. तो इतर कलाकारांपेक्षा खूप वेगळा होता. आपल्या विनोदीने परिपूर्ण होता. आता स्वर्गातून देवालाही हसवत रहा.'

Big B Amitabh Bachchan Post
Ashi Hi Banvabanvi: ३४ वर्षानंतरही 'हा' चुकलेला संवाद बराच गाजलेला

आपल्या कॉमेडीने लाखोंना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या कॉमेडीचे अमिताभ बच्चन देखील चाहते होते. राजू यांच्या अकाली निधनाने चाहत्यांसह सगळेच दु:खी झाले आहेत. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल ४१ दिवस उपचार घेतल्यानंतर बुधवारी राजूचा मृत्यू झाला. राजू यांच्यावर गुरुवारी दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान त्यांना साश्रुनयांनी सोबतच जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. आता २५ सप्टेंबर रोजी मुंबईत राजू श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार उपस्थित राहतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com